शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबंद आंदोलनाने ठप्प पडले वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीसह जिल्ह्यातील विविध ८ ते १० संघटनांनी एकत्र येऊन ...

ठळक मुद्देजिल्हाभरात १०० टक्के प्रतिसाद : शिक्षकांनी केला लाठीमार घटनेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीसह जिल्ह्यातील विविध ८ ते १० संघटनांनी एकत्र येऊन गुरूवारी जिल्हाभर शाळाबंद आंदोलन पुकारले. मुंबई येथे शिक्षकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ शिक्षकांनी पुकारलेल्या या बंदनिमित्त दिवसभर जिल्हाभरातील शाळा बंद होत्या.२५ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई येथे समान वेतन मिळविण्याच्या मागणीसाठी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन केले. दरम्यान आंदोलन करणाऱ्या या शिक्षकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. यात २० ते २५ शिक्षक गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ शिक्षक व शाळांच्या संघटनांनी गुरूवारी दिवसभर शाळाबंद आंदोलन केले. गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा तालुक्यासह अहेरी उविभागातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अहेरी उपविभागाच्या काही शाळांच्या शिक्षकांनी काळ्या फिती लावून लाठीमार हल्ल्याचा तसेच शासनाच्या धोरणाचा निषेध केला.देसाईगंज येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने देसाईगंजच्या तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यिात आले. शिक्षकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. देसाईगंज तालुक्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा आज दिवसभर बंद होत्या. तहसीलदारांना निवेदन देताना पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष अतुल बुराडे, उपाध्यक्ष प्रमोद काशिवार, सचिव रामेश्वर गभने, जी. एम. तिजारे, हिराजी मडावी, केतन कुथे, प्रा. एस. एन. लंजे, प्रा. एल. जे. टिकले, प्रा. विजय कावळे, प्रा. आर. एन. नाकाडे, प्रा. बाळबुध्दे, प्रा. एच. एन. मारगाये, एन. डी. काशिवार, सयाजी कापगते, दिलीप शेंडे व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.सदर शाळा बंद आंदोलनात विनाअनुदानित कृती समिती, मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्रराज्य शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद, विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. या आंदोलनात विनाअनुदानित कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विलास बल्लमवार, संस्थाचालक संघटनेचे राजेंद्र लांजेकर, जयंत येलमुले यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता.शिक्षकांनी लावल्या काळ्या फितीअहेरी तालुक्यातील सर्व शाळा दिवसभर बंद होत्या. अहेरी येथील राजे धर्मराव कृषी विद्यालय, संत मानवदयाल हायस्कूल, भगवंतराव हायस्कूल, च.ल. मद्दिवार प्राथमिक शाळा तसेच इंदाराम येथील अनुदानित शाळा बंद होत्या व येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळाबंद ठेवून तसेच काळ्या फिती लावून मुंबईतील लाठीमार घटनेचा निषेध केला. अहेरी भागासह जिल्हाभरात शाळाबंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Teacherशिक्षक