भामरागड : सीआरपीएफच्या सिविक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील लाहेरी व धोडराज येथे ३७ बटालियनच्या वतीने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. लाहेरी सीआरपीएफ कॅम्पमध्ये आयोजित कार्यक्रमाला सहाय्यक कमांडंट अजित कुमार, सहाय्यक कमांडंट एम. के. मंडिवाल उपस्थित होते. यावेळी नागरिकांना ब्लँकेट, रेडिओ संच, सौरदिवे, महिलांना साड्या तसेच भांडी व अन्य साहित्यांचे वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व युवकांना खेळाचे साहित्यही देण्यात आले. दुर्गम भागातील विकासाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन अजीतकुमार यांनी केले. या कार्यक्रमाला सीआरपीएफचे निरीक्षक जी. डी. जैराम, प्रभारी अधिकारी दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक जी. डी. जंगबहाद्दुर, मुकेश शहा, उनचंूग लुंंगलेंग, आशिष ठाकुर, सतेंद्र ठाकुर उपस्थित होते. धोडराज येथील मेळाव्याला सहायक कमांडंट मोहिंद्रकुमार, सहायक कमांडंट सतींद्रसिंह, प्रभारी अधिकारी भगवान पालवे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना ब्लँकेट, रेडिओ संच, सौरदिवे, महिलांना साड्या तसेच भांडी व अन्य साहित्यांचे वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्यही देण्यात आले. विकासाच्या प्रवाहात येऊन पाल्यांची शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन मोहिंद्रकुमार यांनी केले. अशोककुमार, कांती, थंगल, सचिन चरडे, दत्ता शेळके, सुरेश जायभाय, शिवराज धडवे उपस्थित होते.
सीआरपीएफतर्फे नागरिकांना साहित्य वाटप
By admin | Updated: March 23, 2015 01:22 IST