शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नवी नोट मिळविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकताच

By admin | Updated: November 13, 2016 02:00 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनात असलेली १००० व ५०० ची नोट अचानकपणे रद्द केली.

प्रचंड त्रास : रांगेत उभे राहिलेल्या सर्वसामान्यांची प्रतिक्रियागडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनात असलेली १००० व ५०० ची नोट अचानकपणे रद्द केली. या आता जुन्या झालेल्या नोटा बँकेत जमा करून नवीन दोन हजाराची नोट घेण्यासाठी नागरिकांच्या गेल्या तीन दिवसांपासून बँक परिसरात रांगा लागून आहे. मुंबईसह देशाच्या काही भागात तीन नागरिकांचा नोटा बदलविण्याच्या भानगडीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शनिवारी लोकमतने सकाळपासून रांगेत लागलेल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया शनिवारी दिवसभर जाणून घेतल्या. अनेक नागरिकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी उचलले हे स्वागतार्ह पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. गडचिरोली शहरात भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रच्या परिसरात नोटा बदलविण्यासाठी व नवीन नोट घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या भावना जाणल्या. यावेळी बोलताना गडचिरोली शहरातील साईनगरचे वसंत गेडाम म्हणाले, जुने नोट बदलण्यासाठी आपण को-आॅपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत काल गेलो होतो, परंतु तेथे आपले पैसे बदलले नाही. त्यामुळे आज बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैसे बदलण्यासाठी आलो. सध्या आपल्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने नाईलाजास्तव रांगेत लागावे लागले. काही दिवस सर्वसामान्यांना त्रास होणार असला तरी शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.साईनगरातीलच गजानन उमरे म्हणाले, सरकारचा प्लॅन अतिशय वाखाणण्याजोगा आहे. रांगेत लागावे लागत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मात्र काही दिवसच या परिस्थितीतून सर्वसामान्यांना जावे लागणार आहे. खाते नसलेल्या बँकांमध्ये पैसे बदली करण्यास अडचणी येत आहेत. वसा येथील निलकंठ दुमाने म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. सर्वसामान्यांना या प्रक्रियेतून जाताना त्रास होत असला तरी नकली नोटांवर यामुळे अंकूश लागणार आहे. तसेच या निर्णयाने भविष्यात सकारात्मक परिणाम मिळण्यास मदत होणार आहे.गडचिरोली येथील रामपुरी वॉर्डातील विद्यार्थी योगेश वासनिक म्हणाले, सध्या खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. अनेक दुकानदार ५०० रूपयांचे जुने नोट घेण्यास धजत नाही. काही दुकानदार सामान देतात. परंतु संपूर्ण ५०० रूपयांचे सामान खरेदी करण्यास सांगतात. छोट्याशा वस्तूसाठी ५०० रूपये खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे बँकेसमोर रांगेत लागून त्रास होईल, तरी सहन करणे योग्य वाटते.गडचिरोलीच्या रामनगरातील संजय कामडी म्हणाले, देशातील भ्रष्टाचार रोखणे व धनदांडग्यांनी लपविलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजेचे होते. विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. चार-पाच दिवस त्रास होईल. मात्र काही दिवसातच परिस्थिती सुरळीत होईल. सौरभ धंदरे म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय योग्य व चांगला आहे. निर्णय उशिरा झाला असला तरी, सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. काही दिवस त्रास होईल. मात्र मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी तसेच श्रीमंत लोकांनी दडविलेला पैसा या निमित्ताने बाहेर पडेल. सरकारचा निर्णय देशहिताचा आहे. अशा प्रकारचा निर्णय पूर्वीच घ्यायला हवा होता. गडचिरोली येथील अभय भांडेकर म्हणाले, चांगल्या निर्णयाचा लोकांना त्रास होणारच. सध्या घेतलेला निर्णय देशहिताचा आहे. सुरूवातीच्या दिवसात त्रास होईल, मात्र लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल. या निर्णयामुळे काळ्या पैशाला लगाम लागण्यास मदत निश्चितच होईल.कॉम्प्लेक्समधील पी. एम. दुर्गे म्हणाले, सरकारने योग्य निर्णय घेतला मात्र पैसे बदलणे व जुने पैसे भरण्याची व्यवस्था वेगळी करायला हवी होती. सदर व्यवस्था बँकेतच स्वतंत्रपणे केली असती तरी बँकेच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी आल्या नसत्या. शिवाय बँकेत विनाकारण गर्दी जमली नसती. सध्या बाहेरगावाहून अनेक नागरिक येथे येतात. मात्र अधिकारी व कर्मचारीच बराच काळ बँकेतून गायब राहतात. त्यामुळे बँकेचा व्यवहार ठप्प पडतो. याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो.गडचिरोलीच्या कॅम्प एरियातील रवींद्र समर्थ म्हणाले, सध्या पैसे बदलण्याची सर्वसामान्य नागरिकांना लगबग झाली आहे. शिवाय जुन्या व्यवहारात चालत नसल्याने पैशाची नागरिकांना गरज आहे. अशा स्थितीत पैसे बदलणे व पैसे काढण्यासाठी नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. खेड्यापाड्यातून येथे ग्राहक येत असल्याने गर्दी दिसून येत आहे. सध्या सर्वसामान्यांना त्रास होत असला तरी सरकारचा निर्णय योग्य आहे. चांगल्या निर्णयामुळे त्रास होत असेल तरी काही दिवस सहन करणे योग्यच म्हणावे लागेल.गडचिरोलीच्या कॅम्प एरियातील मनोज मेश्राम म्हणाले, विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय जनहिताचा आहे. पैसे बदलण्यासाठी अथवा पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी नागरिकांना रांगेत लागावे लागत असेल तर ते देशहिताचेच आहे. मेहनत करून गोळा केलेला पैसा बँकेत भरताना त्रास होत असेल तरी गैर नाही. त्यामुळे नागरिकांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून सरकारच्या योजना अंमलबजावणीस सहकार्य करणे देशहिताचेच राहिल. यात त्रास झाला तरी तो सहन करण्याची क्षमता प्रत्येकांनी बाळगावी.गोगाव येथील मुखरू मुनघाटे म्हणाले, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक जुने पैसे बदलण्यासाठी व खर्च करण्यासाठी पैसे काढण्याकरिता बँक येत असल्याने गर्दी दिसून येत आहे. मात्र ही गर्दी चार ते पाच दिवस राहिल. त्यानंतर स्थिती सर्वसामान्य होईल. यात सर्वसामान्याना त्रास होत असेल तरी गैर नाही. (शहर प्रतिनिधी)