शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास अभ्यासक्रमावर मंथन

By admin | Updated: August 13, 2014 23:53 IST

येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठस्तरीय पाचवे व सहावे सेमिस्टर इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा नुकतीच पार पडली.

चामोर्शी : येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठस्तरीय पाचवे व सहावे सेमिस्टर इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत इतिहास विषयाच्या अध्यापन पद्धतीसोबतच इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर विचारमंथन घडून आले.या कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव देवराव पाटील म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश शेंडे यांनी पाचव्या व सहाव्या सेमिस्टरच्या इतिहास अभ्यासक्रमावर प्राध्यापकांकडून प्राप्त झालेल्या शंकांचे निरसन केले. तसेच इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांत गोडी निर्माण करण्यासाठी उदाहरण व दाखल्यांचा अधिक वापर करावा, असे सांगितले. याप्रसंगी देवराव पाटील म्हशाखेत्री यांनी विदर्भाची काशी असलेल्या मार्र्कंडादेव परिसरातील देवतळे महाविद्यालयात इतिहास विषयाच्या प्राध्यापकांची कार्यशाळा घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. इतिहासाच्या प्राध्यापकांनी गडचिरोली जिल्ह्याचा स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहासही अभ्यासावा, असे आवाहन म्हशाखेत्री यांनी यावेळी केले. प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे प्रास्ताविकात म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाने इतिहास विषयासाठी सेमिस्टर पद्धत लागू केली आहे. त्यामुळे या विषयाच्या प्राध्यापकांना इतिहास विषयाची माहिती तसेच परीक्षा पद्धतीबाबत सखोल माहिती असने गरजेचे आहे. तेव्हाच इतिहास विषयाचा प्राध्यापक अध्यापनात यशस्वी होऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. बीए अंतिम वर्षाच्या पाचवे व सहावे सेमिस्टरच्या चर्चासत्रात प्राध्यापक घनश्याम सोनवने, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. रश्मी बेड, डॉ. दिवाकर कामडी, डॉ. घोनमोडे, डॉ. शंभरकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. भूपेश चिकटे होते. यावेळी प्रा. घनश्याम सोनवाने, प्रा. शरद बेलोरकर, प्रा. दशरथ आदे आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे संचालन प्रा. हटवार यांनी केले तर आभार प्रा. राजेंद्र झाडे यांनी मानले. या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठातील इतिहास विषयाचे बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी देवतळे महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)