शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चुडीयालची शाळा भरते समाजभवनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:03 AM

चुडीयाल येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून ही शाळा दोन शिक्षकी आहे. सदर शाळा इमारत मोडकळीस आल्यानंतर येथील शिक्षकांनी वऱ्हाड्यात वर्ग भरविणे सुरू केले. पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन ही शाळा, त्यानंतर नजीकच्या अंगणवाडीत स्थलांतरित झाली. दरम्यान शाळेची व अंगणवाडी केंद्रातील मुले, मुली एकत्र बसू लागल्याने अध्यापनाच्या कार्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे या शाळेचे वर्ग उन्हाळ्यात चिंचेच्या झाडाखाली भरविण्यात येऊ लागले.

ठळक मुद्देस्वतंत्र इमारत नाही : दारे, खिडक्या, प्लास्टर नसलेल्या अपूर्ण इमारतीत सुरू आहे वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर चुडीयाल येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. मात्र येथील जुनी जीर्ण इमारत निर्लेखित केल्यानंतर नवी इमारत बांधण्यात आली नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून येथील शाळा बेघर झाली असून सध्या ही शाळा समाजभवनाच्या अपूर्ण इमारतीत भरविली जात आहे.चुडीयाल येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून ही शाळा दोन शिक्षकी आहे. सदर शाळा इमारत मोडकळीस आल्यानंतर येथील शिक्षकांनी वऱ्हाड्यात वर्ग भरविणे सुरू केले. पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन ही शाळा, त्यानंतर नजीकच्या अंगणवाडीत स्थलांतरित झाली. दरम्यान शाळेची व अंगणवाडी केंद्रातील मुले, मुली एकत्र बसू लागल्याने अध्यापनाच्या कार्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे या शाळेचे वर्ग उन्हाळ्यात चिंचेच्या झाडाखाली भरविण्यात येऊ लागले. पुन्हा येथेही झाडावरचे कीटक, पालापाचोळा अंगावर पडत असल्याने व पावसाळा सुरू झाल्याने ही शाळा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरविण्यात येऊ लागली. ग्रा.पं.चा कारभार एका कोपऱ्यात व शाळेचा कारभार दुसºया कोपºयात असे सुरू होते. येथे दोन्ही यंत्रणेला अडचणी येऊ लागल्याने त्यानंतर ही शाळा गावातीलच अधर्वट बांधकाम झालेल्या समाजभवनाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली. तेव्हापासून ही शाळा याच इमारतीत भरत आहे. समाजभवनाच्या इमारतीला दरवाजे व खिडक्या बसविण्यात आले नाही. केवळ स्लॅबच्या खाली विना प्लास्टरच्या इमारतीत शाळेचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विना प्लास्टरच्या शाळेत शैक्षणिक साधने व साहित्याचा वापर करता येत नाही. ही इमारत खुली असल्याने येथे मोकाट जनावरे, डुकरांचा हैदोस असतो. परिणामी येथे रात्रीच्या सुमारास घाण निर्माण होते. कशीबशी स्वच्छता करून पुन्हा येथेच वर्ग बसविले जातात.जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन सुस्तग्रामपंचायतीचे गाव असलेल्या चुडीयाल येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतची शाळा असून या शाळेला स्वतंत्र इमारत नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. मात्र नवी शाळा इमारत मंजूर करून ती बांधण्यासाठीची कुठलीही कार्यवाही जि.प.व पं.स.प्रशासनाकडून अद्यापही करण्यात आली नाही. नव्या शाळा इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले नसून येथील विद्यार्थी व पालकांवर अन्याय होत आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा