शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

चामोर्शीतील तांदूळ पोहोचला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:54 IST

जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीच्या बारिक तांदळाच्या धानाचे उत्पादन घेत आहेत.

ठळक मुद्देमोठ्या शहरातून मागणीरूचकर व बारिक तांदळाला अधिक पसंती

लोमेश बुरांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीच्या बारिक तांदळाच्या धानाचे उत्पादन घेत आहेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची चामोर्शी शहरात भरडाई केली जाते. त्यानंतर मागणीनुसार राईस मिल मालक मोठ्या शहरांसह परराज्यात चामोर्शीतील बारिक तांदळाचा पुरवठा करीत आहेत. यंदाही शेकडो क्विंटल बारिक तांदूळ मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात पोहोचला आहे.चामोर्शी तालुका मुख्यालयी एकूण १६ राईस मिल आहेत. जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यानंतर सर्वाधिक राईस मिल चामोर्शी तालुक्यात आहेत. शेतकरी खरीप हंगामात विविध जातीच्या बारिक धानाची लागवड करतात. मुख्यत्त्वे उच्च प्रतीच्या बारिक तांदळाला मोठ्या शहरांसह परराज्यात मागणी असल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी बारिक धानाच्या उत्पादनाकडे वळले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात एकरी सरासरी २० ते २५ पोती इतके धानाचे उत्पादन झाले आहे. या भागातील नागरिकांचा आर्थिक लेखाजोखा व उदरनिर्वाह धान उत्पादनावरच चालतो. धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने चामोर्शीत तांदळाची बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.येथील राईस मिलमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तांदळावर प्रक्रिया होऊ लागली. पाहतापाहता चामोर्शी तालुक्यातील तांदळाला मध्यप्रदेशासह छत्तीसगड राज्यात मागणी वाढली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील बीड, लातूर, वाशिम तसेच मुंबई, पुणे या मोठ्या शहरांतही चामोर्शीच्या तांदळाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.शहरातील अनेक मोठ्या राईस मिलमध्ये बारिक धानाच्या तांदळाची पोती तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. राईस मिलमधून निघणाºया धानाच्या कोंड्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. येथील कोंडा विटाभट्टी, पॉवर प्लान्ट व इतर कंपन्यांना पुरविला जात आहे.अशी होते तांदूळ निर्मिती प्रक्रियाराईस मिलमध्ये भरडाईसाठी तांदूळ आणल्यानंतर डिशमधून खडे, कचरा आदींची साफसफाई केली जाते. त्यानंतर रबर रोलरमध्ये धान भरडाईसाठी टाकला जातो. त्यानंतर यंत्रातून तांदूळ व कुकूस वेगवेगळे केले जातात. ग्रेडर मशीनमधून बारिक व ठोकळ तांदूळ वेगवेगळा केला जातो. त्यानंतर तांदळाला तीन वेळा पॉलिशची प्रक्रिया करून दोन वेळा सिल्की व पुन्हा ग्रेडिंग केल्यानंतर सॉरिटेजमधून बाहेर आलेला तांदूळ पोत्यात भरला जातो. अशा प्रकारे तांदूळ निर्मिती प्रक्रिया पूर्ण केली जाते.

टॅग्स :agricultureशेती