शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

२१ मॉडेलची राज्यस्तरासाठी निवड

By admin | Updated: August 11, 2015 02:06 IST

स्थानिक शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून राज्यस्तरासाठी २१ प्रतिकृतींची

गडचिरोली : स्थानिक शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून राज्यस्तरासाठी २१ प्रतिकृतींची निवड करण्यात आली व सोमवारी या विज्ञान प्रदर्शनीचा समारोप झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. मुख्य अतिथी म्हणून आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सीईओ संपदा मेहता, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरासाठी प्रतिकृती निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थ्यासह सर्व घटकांनी वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगून पर्यावरणपुरक विज्ञान स्वीकारावे जेणेकरून भविष्यात विज्ञानाचा वापरामुळे नुकसान पोहोचणार नाही, असे पालकमंत्री आत्राम यावेळी सांगितले.राज्यस्तरासाठी निवड झालेल्या मॉडेलमध्ये देसाईगंज येथील प्रगती हायस्कूलचा विद्यार्थी पियूष किशोर कुमरे, विसोरा येथील विनायक विद्यालयाचा विद्यार्थी अश्विन राष्ट्रपाल डांगे, चामोर्शी तालुक्यातील बहाद्दूरपूर येथील नेताजी हायस्कूलची विद्यार्थिनी चंद्रकला सूर्या मोडी, कारमेल अकॅडमी चामोर्शीचा विद्यार्थी रचित प्रशांत कोटगीरवार, शिवाजी हायस्कूल चामोर्शीचा विद्यार्थी सोहन गुणवंत वनकर, देशबंधू चित्तरंजनदास येनापूरचा विद्यार्थी अनिकेश खोकन मंडल, राजीव गांधी विद्यालय सोनापूरचा विद्यार्थी निखील राजू शेंडे, प्रियदर्शनी विद्यालय धानोराचा विद्यार्थी सुरज दिनकर सूर्यवंशी, तिरूपती विद्यालय कोकडीचा विद्यार्थी अमोल देवाजी बन्सोड, गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोलीचा विद्यार्थी प्रतिक भास्कर कलाम, राजे धर्मराव हायस्कूल अहेरीचा विद्यार्थी प्रेमदास बोरूले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरवळाचा विद्यार्थी भूषण यादव बांबोळे, मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील नेताजी हायस्कूलचा विद्यार्थी संदीप दुलाल मंडल, राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्लीचा विद्यार्थी ज्ञानेश्वर बंडू मोहुर्ले, जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळा गडचिरोलीची विद्यार्थिनी पायल अरविंद नैताम, चामोर्शी तालुक्यातील रविंद्रपूर येथील रविंद्रनाथ टागोर हायस्कूलची विद्यार्थिनी पूजा मनोहर मंडल, चामोर्शी तालुक्यातील माल्लेरमाल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी रिना नरेंद्र मोहुर्ले, नंदीगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सपना दुर्गू मुहंदा, धानोरा तालुक्यातील मॉडेल स्कूल मोहलीचा विद्यार्थी अभय धनिराम कोराडे, आरमोरी येथील विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी यज्ञ श्रीपद वाटे व धर्मराव कृषी विद्यालय अहेरीची विद्यार्थिनी माहेश्वरी चिन्नम आलाम यांच्या प्रतिकृतींची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे. समारोप कार्यक्रमाचे संचालन अनिल काळे, प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम तर आभार मानिक साखरे यांनी मानले.