शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ट्रॅक्टरलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:12 IST

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री व साहित्य अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत असून यावर्षी १२०० पेक्षा अधिक अर्ज केवळ ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी उपलब्ध झाले आहेत.

ठळक मुद्दे१२०० पेक्षा अधिक अर्ज : कृषी विभागाची अनुदान योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री व साहित्य अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत असून यावर्षी १२०० पेक्षा अधिक अर्ज केवळ ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी उपलब्ध झाले आहेत.आधुनिक पध्दतीने शेती करायची असेल तर त्यासाठी यंत्र सामुग्री असणे आवश्यक आहे. मात्र यंत्र सामुग्रीची किंमत लाखो रूपये राहत असल्याने सर्वसाधारण शेतकरी एवढे महागडे साहित्य खरेदी करू शकत नाही. संबंधित साहित्य खरेदीवर काही अनुदान उपलब्ध करून दिल्यास शेतकरी साहित्य खरेदी करेल. या उद्देशाने शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धानाची चिखलणी करावी लागते. चिखलणीचे काम बैलांच्या मदतीने केले जात असले तरी सदर काम अतिशय कष्टदायक आहे. त्याचबरोबर रोवणीचा कालावधी सुध्दा लागतो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मात्र चिखल चांगले होते. त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या मदतीने इतरही शेतीउपयोगी कामे करता येत असल्याने अनुदानांतर्गत इतर साहित्यांपेक्षा शेतकरी ट्रॅक्टरलाच अधिक पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.शेतकºयांना यंत्रसामुग्री व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण, उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या तीन योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, रोटोवेटर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, दालमिल आदी यंत्र उपलब्ध करून दिली जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरचीच मागणी करीत असल्याचे दिसून येते.यावर्षी कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत केवळ १९ ट्रॅक्टरचे लक्षांक प्राप्त झाले आहे. मात्र जिल्हाभरातील १ हजार २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठीच अर्ज केला असल्याचे दिसून येते. १९ ट्रॅक्टरच्या लक्षांकापैकी प्रत्येक तालुक्याला एक ते दोनच ट्रॅक्टरचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यासाठी मात्र प्रत्येक तालुक्यात १०० च्या जवळपास अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर अवजारांसाठी मात्र अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.मागील वर्षी ४४४ ट्रॅक्टरचे वितरणमागील वर्षी जिल्हाभरात सुमारे ४४४ ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर २७ रोटावेटर, १९ मळणी यंत्र, एक पेरणी यंत्र, तीन कल्टीवेटर, एक दालमिलचे वितरण झाले. यावर्षी मात्र कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत केवळ १९ ट्रॅक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचबरोबर १० पॉवर टिलर, ३६ रोटावेटर, चार पेरणी यंत्र, चार रिपर, सहा मनुष्यचलित पीक संरक्षण यंत्र, एक प्रक्रिया यंत्राचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उद्दिष्ट कमी आहे. त्यातचही ट्रॅक्टरचे उद्दिष्ट कमी असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. काही तालुक्यांमध्ये सोडतीला सुरूवात झाली आहे. यावर्षी केवळ कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर उपलब्ध झाले आहे. इतर योजनांमधून ट्रॅक्टर उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांनी केलेले अर्ज ३१ मार्च २०१९ पर्यंत वैध आहेत. सुरूवातीचे लक्षांक पूर्ण झाल्यानंतर आणखी लक्षांक उपलब्ध होईल. गडचिरोली जिल्ह्यातून सर्वाधिक ट्रॅक्टरची मागणी झाली आहे. त्यामुळे यानंतरचे प्राप्त होणारे लक्षांक हे ट्रॅक्टरसाठीच राहण्याची शक्यता आहे.- अनंत पोटे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती