शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

गडचिरोलीच्या मार्केटची चिनी फटाक्यांना बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

अलिकडे काही वर्षांपासून फटाका मार्केटवर चिनी बनावटीच्या फटाक्यांचे वर्चस्व राहात आहे. काही चिनी बनावटीच्या फटाक्यांची लहान मुलांमध्ये क्रेझ आहे. परंतू यावर्षी विक्रेत्यांसाठी चिनी फटाक्यांप्रमाणेच आनंद देणारे भारतीय बनावटीचे फटाके उपलब्ध झाले. शिवाकाशी येथील मुख्य फटाका निर्मिती कारखान्यांमध्ये सर्व प्रकारचे फटाके तयार झाल्यामुळे विक्रेत्यांनीही चिनी फटाक्यांना बगल दिली.

ठळक मुद्देफॅन्सीला पसंती : ध्वनी आणि वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची क्रेझ घटली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : दिवाळी आणि फटाके हे समीकरण अविभाज्य आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी ही कल्पनाही आपण करू शकत नाही. यंदाच्या दिवाळीतही गडचिरोली शहरासह जिल्हाभरात फटाके फुटले. मात्र यावेळी शहरी भागात ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण करणाºया फटाक्यांच्या तुलनेत शोभेच्या फटाक्यांना लोकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. प्रदुषणाबाबत लोकांमध्ये जागृती येत असल्याचे यावरून दिसून येत आहे.अलिकडे काही वर्षांपासून फटाका मार्केटवर चिनी बनावटीच्या फटाक्यांचे वर्चस्व राहात आहे. काही चिनी बनावटीच्या फटाक्यांची लहान मुलांमध्ये क्रेझ आहे. परंतू यावर्षी विक्रेत्यांसाठी चिनी फटाक्यांप्रमाणेच आनंद देणारे भारतीय बनावटीचे फटाके उपलब्ध झाले. शिवाकाशी येथील मुख्य फटाका निर्मिती कारखान्यांमध्ये सर्व प्रकारचे फटाके तयार झाल्यामुळे विक्रेत्यांनीही चिनी फटाक्यांना बगल दिली.यावर्षी सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बसारख्या मोठ्या आवाज करणारे फटाके नागरिकांच्या पसंतीस उतरले नाही. याशिवाय सापाची गोळी, तिडतिडी, मोठ्या फटाक्यांच्या लळी, अनार यासारख्या जास्त धूर सोडणाºया फटाक्यांनाही ग्राहकांनी टाळले. त्याचवेळी आकाशात जाऊन मनमोहक आकारात फुटणाºया फटाक्यांना लोक जास्त पसंती देत असल्याचे फटाका व्यावसायिकांनी सांगितले.गडचिरोली शहरात अनेक वर्षांपासून शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दिवाळीच्या काळात फटाक्यांची दुकाने लागतात. यावर्षीही या दुकानांनी दिवाळीची चाहुल लागताच फटाक्यांची दुकाने मांडली. पण शनिवारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाचा फटाका या व्यावसायिकांना बसला. ऐन फटाके विक्रीची सर्वाधिक विक्री होण्याच्या वेळीच विक्री ठप्प पडली होती. त्यातच पावसाच्या सर्दाव्यामुळे काही फटाके फुटले नाही. त्यामुळे ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली.नियमांना डावलून विक्रीफटाके ज्वलनशील असल्यामुळे फटाके विक्रीचा परवाना देताना विविध प्रकारच्या अटी लावल्या जातात. त्या अटीनुसार सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही फटाक्याचे दुकान नागरी वस्तीत लावता येत नाही. मोकळ्या मैदानात ते असावे, दुकानात कापडाचा वापर करू नये. दुकानाच्या वर टिनाचे शेड असावे असे अनेक नियम आहेत. परंतू शहराच्या मूल मार्गावरील, नवेगाव भागातील काही विक्रेत्यांनी नियम डावलून चक्क नागरी वस्तीमधील घरात आणि रस्त्यालगत कापडी पडदे लावून दुकाने थाटली आहेत. एकीकडे शहरातील बहुतांश फटाका विक्रेते शिवाजी कॉलेजच्या मैदानात रितसर दुकाने लावत असताना नियमबाह्यपणे दुकाने लावणाºया त्या दुकानदारांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल विक्रेत्यांकडून केला जात आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी