लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन एटापल्ली येथील आठवडी बाजार भरविणे बंद झाले. परंतु तोच बाजार काही दिवसांनी एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील पंदेवाही टोला येथे दर मंगळवारी भरविण्यास सुरूवात झाली. परंतु या बाजारात स्थानिक व्यापारी न येता छत्तीसगड राज्यातील व्यापारी गर्दी करू लागल्याने कोरोना विषाणूचा धोका बळावला. सदर प्रकार अवैध असल्याने बाजार भरविणे बंद करावे, अशी मागणी गुरूपल्ली ग्रामपंचायत व व्यापारी संघटनेने एसडीओ व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर एटापल्ली येथील आठवडी बाजार भरविणे बंद झाले. मात्र तोच बाजार शहरापासून १ किमी अंतरावरील व गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पंदेवाही टोला येथे भरविण्यास सुरूवात झाली. या बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांसह छत्तीसगड राज्यातील व्यापारी येऊन आपला माल विक्री करतात. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग बळावण्याची शक्यता आहे.सदर अनधिकृत बाजार भरविणे बंद करावे, अशी मागणी एटापल्ली येथील व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांनी स्वीकारले.ग्रा.पं.कडून करवसुलीपंदेवाही टोला हे गाव गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. येथे बाजार भरविण्यासाठी ग्रा.पं.कडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही, अशी कबुली ग्रा.पं.ने एसडीओंकडे १७ जून रोजी निवेदनाद्वारे दिली. त्यानंतर कर वसुली बंद करीत कारवाईची मागणी केली. तरी सुद्धा बाजार भरविणे सुरूच होते.
पंदेवाहीच्या बाजारात छत्तीसगडचे व्यापारी; कोरोना संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर एटापल्ली येथील आठवडी बाजार भरविणे बंद झाले. मात्र तोच बाजार शहरापासून १ किमी अंतरावरील व गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पंदेवाही टोला येथे भरविण्यास सुरूवात झाली. या बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांसह छत्तीसगड राज्यातील व्यापारी येऊन आपला माल विक्री करतात. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग बळावण्याची शक्यता आहे.
पंदेवाहीच्या बाजारात छत्तीसगडचे व्यापारी; कोरोना संसर्गाचा धोका
ठळक मुद्देअनधिकृत प्रकार । कारवाई करण्याची ग्रा.पं. व व्यापारी संघटनेची मागणी