शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:54 IST

राष्ट्रीय कुुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते.

ठळक मुद्देचामोर्शी तालुका : कुटुंब लाभ योजनेतून प्रत्येकी २० हजारांचे अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : राष्ट्रीय कुुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. या अंतर्गत मार्च २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १२ लाभार्थ्यांना कार्यालयाकडून लाभ देण्यात आला. यापैकी तीन लाभार्थ्यांना रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात तर नऊ लाभार्थ्यांना चामोर्शी तहसील कार्यालयात धनादेश वितरित करण्यात आले. यामध्ये हळदी चक येथील अमृता महादेव भोयर, लखमापूर येथील सविता खोमेश्वर मेश्राम, सगणापूर येथील पुष्पा संजय कुमरे, वाघोली येथील सविता विजय वासेकर, सुभाषग्राम येथील गीता मनोज बिश्वास, जामगिरी येथील नीलिमा रमेश गावडे, घोट येथील मायाबाई काशिनाथ कुमरे, गौरीपूर येथील शोभा सुखरंजन घरामी, कुनघाडा रै. येथील बेबी हरिदास किरमे, राजगोपालपूर येथील सिंधूबाई हिरामण कावळे, रेगडी येथील देवाजी केये वड्डे, कर्दुळटोला येथील बंडू तुलाराम गुरनुले यांचा समावेश आहे.तहसीलदार अरूण येरचे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार एस. के. बावणे उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ग्रामीण पातळीवर महसूल यंत्रणेमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांनी संबंधित तलाठ्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन तहसीलदार येरचे यांनी केले.