लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चर्मकार समाजाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी मंगळवारी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त चामोर्शी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेच्या निमित्ताने चर्मकार समाजाच्या एकतेचे दर्शन घडले. समाजाच्या सचिव आनंदाबाई वाढई यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले.ढोलताशांच्या गजरात संत रोहिदास महाराज भवन येथून वाळवंटी चौक, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मीगेट, बसस्थानक, बाजार समिती मार्गे मिरवणूक काढून समाज मंदिरात मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टरवर भजन, सुगम संगीत, भक्तीगिते यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी न.प. उपाध्यक्ष राहूल नैताम, प्राचार्य शाम रामटेके, विजय ढाक, आनंद वाढई, जगदिश बन्सोड, हरी भशारकर, मयुर इंगोले, रोहिदास म्हशाखेत्री, जगदिश वाढई, श्याम बन्सोड, शामराव म्हशाखेत्री, दिलीप म्हशाखेत्री, श्यामराव मुळे, पुंडलिक मुळे, युवराज काहवले, एकनाथ नवले, आकाश मुडे, उमेश मुडे, कैलास बन्सोड, राजकुमार बन्सोड, केशव ढाक, अतुल बन्सोड, ईश्वर नवले, नरेश बन्सोड, रवी ढाक, चंद्रभान बन्सोड, सुभाष म्हशाखेत्री, श्रीकृष्ण म्हशाखेत्री, ढिवरू पाटील, लिलाबाई बन्सोड, परशुराम मुळे, दिवाकर मुळे, शेवंता नवले, सखूबाई ढाक, ताराबाई ढाक, अर्चना म्हशाखेत्री, गिता मुळे, आशा म्हशाखेत्री, सुनंदा म्हशाखेत्री, अश्विनी वाढई, मंदा नवले, माया मुळे, शोभा बन्सोड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. शोभायात्रेनंतर महाप्रसादाचे वितरण झाले.
संत रोहिदासांच्या रॅलीसाठी चर्मकार समाज एकटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:06 IST
चर्मकार समाजाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी मंगळवारी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त चामोर्शी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेच्या निमित्ताने चर्मकार समाजाच्या एकतेचे दर्शन घडले.
संत रोहिदासांच्या रॅलीसाठी चर्मकार समाज एकटवला
ठळक मुद्देजयंती उत्सव : चामोर्शी शहरात पार पडला कार्यक्रम