गडचिरोली : वनशेतीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल तालुक्यातील पारडी येथील शेतकरी चंद्रशेखर मुरतेली यांचा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते कृषी दिनानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सीईओ संपदा मेहता उपस्थित होत्या. मुरतेली यांनी २५ एकर शेतीमध्ये १५ एकरमध्ये सुबाभूळ, ३ एकरमध्ये सागवान, शिवण, आंबा, चिकू, लिंबाची लागवड केली आहे. (शहर प्रतिनिधी)
चंद्रशेखर मुरतेली यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
By admin | Updated: July 4, 2015 02:32 IST