शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

चामोर्शीत लोटला अलोट जनसागर

By admin | Updated: May 12, 2014 23:41 IST

मुरी जंगल परिसरात पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून अभियानावरून परतणार्‍या पोलीस जवानांचे वाहन उडवून दिले.

चामोर्शी : मुरमुरी जंगल परिसरात पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून अभियानावरून परतणार्‍या पोलीस जवानांचे वाहन उडवून दिले. यात चामोर्शी येथील सी-६0 पथकात कार्यरत रोशन हनुमंत डंबारे हा शहीद झाला. पोलीस विभागाने त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या सुपूर्द केल्यानंतर सोमवारी सकाळी ११.३0 वाजता चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंंडा घाटावर शहीद जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यावसायिकांनी शहरातील १00 टक्के दुकाने बंद ठेवून भावपूर्ण o्रद्धांजली अर्पण केली.o्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शहीद रोशनचे कुटुंबीय व त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान यावेळी सार्‍यांचेच डोळे पाणावले होते. बाजारपेठ बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. (शहर प्रतिनिधी)

सेवानवृत्त नायब तहसीलदार हनुमंत डंबारे यांच्या निवासस्थानापासून शहीद रोशन डंबारे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी चामोर्शी शहर तसेच परिसरातील अलोट जनसमुदाय लोटला होता. यावेळी चामोर्शी शहरातील प्रत्येक घरातील नागरिकांनी अंत्ययात्रेत सहभागी होऊन शहीद रोशनला

तीन महिन्याच्या चिमुकलीचे पितृछत्र हरवले

सी-६0 पथकात कार्यरत रोशन हनुमंत डंबारे हे चामोर्शी येथील रहिवासी होते, त्यांचे वडील सेवानवृत्त तहसीलदार आहेत. रोशन हा आपली पत्नी व तीन महिन्याच्या चिमुकल्या मुलीसह गडचिरोली शहरातील रामनगर परिसरात राहत होता. रोशन सी-६0 पथकासमवेत पावीमुरांडा-मुरमुरी जगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवून वाहनाने परत येत होता. दरम्यात, नक्षल्यांनी त्यांचे वाहन भूसुरूंग स्फोटात उडवून दिल्याने रोशन जागीच ठार झाला. यामुळे तीन महिन्याच्या चिमुकलीचे पितृछत्र हरविले. तसेच काळाच्या नियतीने घाला घातल्याने रोशनच्या पत्नीवर प्रचंड आघात झाला. एक महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलीचा नामकरण विधी पार पडला होता. त्यांच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.