शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भाजपसमोर लोकसभेचे मताधिक्य टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: October 5, 2014 23:05 IST

मोदी लाटेवर स्वार झालेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह सबंध देशात अभूतपूर्व यश मिळविले. लोकसभा मतदार संघात सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने

अभिनय खोपडे - गडचिरोलीमोदी लाटेवर स्वार झालेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह सबंध देशात अभूतपूर्व यश मिळविले. लोकसभा मतदार संघात सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने मोठे मताधिक्य घेत तब्बल २ लाख ३६ हजार ८७० मतांनी विजय मिळविला. आता अवघ्या काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासमोर लोकसभेच्या निवडणुकीत मिळविलेले यश कायम ठेवण्याची मोठी कसोटी आहे. भाजप यात किती यशस्वी होतो, हे १९ आॅक्टोबरच्या निकालाने स्पष्ट होईल. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ येतात. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व चिमूर तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्यावतीने अशोक नेते विजयी झालेत. अशोक नेते यांना गडचिरोली विधानसभा मतदार संघात ६९ हजार ९, अहेरी विधानसभा मतदार संघात ४३ हजार ६७३, आरमोरी विधानसभा मतदार संघात ४२ हजार ६७७ मतांची आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेना स्वतंत्ररीत्या तीन विधानसभा मतदार संघात मैदानात उभी आहे. भाजपची ताकद अहेरी व आरमोरी विधानसभा मतदार संघात गडचिरोलीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भाजपसमोर मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. अशोक नेते यांना पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्तिगतही बऱ्याच मतदारांनी कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाहून मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक राहते, असे अनेक अभ्यासक मानतात. त्यामुळे भाजपसमोर मताधिक्य टिकविण्याचे आव्हान आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदार संघात १ लाख १५ हजार १६७ एवढे विक्रमी मताधिक्य मिळाले होते. तर काँग्रेसला केवळ ४६ हजार १५८ मतदान मिळाले. आरमोरी विधानसभा मतदार संघात भाजपला ९० हजार ८८५ तर काँग्रेसला ४२ हजार २०८, अहेरी विधानसभा मतदार संघात अशोक नेते यांना ७६ हजार ९९२ तर काँग्रेसला ३३ हजार ३१९ मते मिळाली. हे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरात पडते काय, हे पाहावे लागणार आहे. शिवसेना स्वतंत्र लढत असल्याने आरमोरी मतदार संघात भाजपला एकट्यालाच झुंज द्यायची आहे. चार तालुके व धानोरा तालुक्याचा काही भाग या मतदार संघात येतो. अहेरी विधानसभा मतदार संघात नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत भाजप आघाडी करून आहे. मात्र नाविसचे नेतृत्व भाजपला या मतदार संघात मोजायलाही तयार नसल्याची चर्चा आहे. नामांकन पत्र भरण्यासाठी उमेदवारासोबत भाजपचा एकही नेता बैलबंडीवर नव्हता. केवळ नाविसच्या भवरशावरच उमेदवाराचा सध्या प्रचार सुरू आहे. खासदारांशी बिनसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपला अहेरीत मोठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आजवर भाजपचे प्राबल्य राहत आले. या विधानसभा मतदार संघात चामोर्शी हा सर्वात मोठा तालुका समाविष्ठ आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत. रिंगणात असलेल्या उमेदवारामध्ये भाजपचाच उमेदवार चामोर्शी तालुक्याचा आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपला लोकसभेच्या मताधिक्याएवढे मतदान मिळविणे शक्य होईल काय, हे ही पाहावे लागणार आहे. सध्या तरी खासदार अशोक नेते व भाजपच्या इतर नेत्यांना पक्षातील बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. ज्या तिकीट इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, ते ही नाराज न होता. प्रचाराला भिडले आहे. दररोज नवे भिडू पक्षात दाखल होत आहेत. त्यांचा आपल्याला उपयोग किती हे लक्षात न घेता आदमी बढाव, हा भाजपचा कार्यक्रम सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने डॉ. तामदेव दुधबळेसारखा बहुजन समाजाचा माणूस पक्षापासून दुरावल्याचे चित्र दिसून येत आहे. खासदार व दुधबळे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे बोलले जात आहे. एकूणच भाजपसमोर लोकसभेचे मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस जणांचाही भाजपला छुपा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने येथे माना समाजाचा उमेदवार दिल्याने भाजप गैरआदिवासी व पेसापासून त्रस्त झालेले मतदार आपल्याकडे वळतील, या आशेवर आहे. केंद्र सरकारकडून पेसा कायद्यात बदल करून आणू हे सांगण्यासाठी राज्य सरकारला कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी व जास्त करता येत नाही, असा अध्यादेशाचा आधार भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजप या मतदार संघात आपला गेम जमविण्याच्या तयारीत आहे. मात्र भाजपसमोर साऱ्या आव्हानांचा सामना आहे.