शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

एकलपूरचा चिक्कू नागपुरात

By admin | Updated: June 8, 2014 23:54 IST

देसाईगंज तालुक्यातील एकलपूर हे छोटेसे गाव भाजीपाला व फळांच्या उत्पादनाने नावारूपास आले असून येथील चिक्कूने थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या

२५ वर्षापूर्वीच्या मेहनतीचे फळ : कृषी विभागाचे मात्र दुर्लक्षकोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यातील एकलपूर हे छोटेसे गाव भाजीपाला व फळांच्या उत्पादनाने नावारूपास आले असून येथील चिक्कूने थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकार्‍यांचे मार्गदर्शन मिळाले असते तर उत्पादनात आणखी वाढ झाली असती, अशी अपेक्षा येथील शेतकरी वर्ग करीत आहेत.धानाच्या पिकाचा उत्पादन खर्च परवडत नसल्याचे कारण शेतकरीवर्ग सांगत असला तरी बहुतांश शेतकरी अजूनही पारंपरिकरितीने धानाचेच उत्पादन घेत आहेत. मात्र एकलपूर येथील प्रयोगशील शेतकरी महादेव मुकुंदा सयाम व शंकर मुकुंदा सयाम यांनी धानाच्या शेतीला मुठमाती देत दोन एकर शेतात चिक्कू व फणसाच्या झाडांची २0 वर्षापूर्वी लागवड केली. चिक्कू व फणसाचे झाड लावण्यासाठी तत्कालीन कृषी अधिकारी भांदककर व एन. टी. पारखी यांनी महादेव सयाम व शंकर सयाम यांना मार्गदर्शन केले. दोघांनीही फणव व चिक्कुच्या झाडांची योग्यपद्धतीने लागवड करून त्यांची निगा राखली. काही वर्षानंतर झाडांना फळे यायला सुरूवात झाली. एका झाडापासून ५ ते ७ क्विंटल चिक्कूचे उत्पादन होते. तर एका फणसाच्या झाडापासून सुमारे २0 ते ३0 हजार रूपयाचे उत्पन्न मिळते. सयाम यांच्या शेतातील चिक्कू मोसंबी एवढे असल्याने ग्राहक सहज आकर्षीत होतो. त्याचबरोबर सदर चिक्कू अत्यंत गोड आहेत. त्यामुळे नागपूरचे व्यापारी स्वत: एकलपूर येथे येऊन खरेदी करतात. एकलपूर हे गाव भाजीपाला उत्पादनासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या गावातून दर दिवशी ५0 क्विंटलपेक्षा जास्त भाजीपाल्याचे उत्पादन होते. भाजीपाला हे पीक विशेषकरून हिवाळ्यात व उन्हाळ्यात घेतले जाते. याच शेतात पावसाळ्यादरम्यान धान पिकाचेही उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांना शेतीच्या माध्यमातून वर्षभर रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे एकलपूर हे गाव देसाईगंज तालुक्यातील एक सधन गाव म्हणून ओळख आहे. या गावाचा आदर्शन इतरही गावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)