शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

आरोपीच्या अटकेसाठी आरमोरीत चक्काजाम

By admin | Updated: December 3, 2015 01:35 IST

स्थानिक स्व. इंदिरा गांधी वसतिगृहातील ११ वर्षीय विद्यार्थिनी तृणाली महेंद्र चौधरी हिचा वसतिगृहानजीकच्या विहिरीत मंगळवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

कडकडीत बंद पाळला : अधीक्षिका व चौकीदारावर खुनाचा गुन्हा दाखल आरमोरी : स्थानिक स्व. इंदिरा गांधी वसतिगृहातील ११ वर्षीय विद्यार्थिनी तृणाली महेंद्र चौधरी हिचा वसतिगृहानजीकच्या विहिरीत मंगळवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी वसतिगृहाच्या अधीक्षिका व चौकीदार यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी विविध पक्षांच्या वतीने बुधवारी आरमोरी येथे कडकडीत बंद पाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.जोपर्यंत संबंधित दोषींना अटक होणार नाही, तोपर्यंत मृतक विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीय, नातलग व आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे आरमोरी शहरात काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली. मृतक विद्यार्थिनीच्या वडिलांनी आरमोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा वसतिगृहाच्या अधीक्षिका अंजली मुरलीधर लांजेवार व वसतिगृहाचे चौकीदार राजेंद्र लहू कुंभारे यांच्या विरोधात भादंविचे कलम ३०२/३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी विविध राजकीय पक्ष व संघटनेच्या वतीने आरमोरी शहरातील शाळा, महाविद्यालय, मुख्य बाजारपेठ बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी १२ वाजता गडचिरोली-आरमोरी मार्गावरील इंदिरा गांधी चौकात मृतक विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेत व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. जवळपास दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आरमोरी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस दलही पाचारण करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसीलदार मनोहर वलथरे, पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांच्याशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली व त्यांची समजूत काढण्यात आली. आंदोलक एकण्याच्या स्थितीत नसल्याने माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार यांचा हात पकडून पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संतप्त जमाव पोलीस ठाण्यासमोर जमा झाला. यावेळी शिष्टमंडळाला पाचारण करून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मंगळवारपासून शवगृहात ठेवण्यात आलेल्या मृतक विद्यार्थिनीच्या शवावर दुपारी ३.१५ वाजता शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक विद्यार्थिनीने लिहिलेची चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्यातील अक्षराची तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकरणात काही तथ्य व पुरावे आढळल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे डॉ. सागर कवडे यांनी सांगितले. (वार्ताहर)