शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ गावात, ग्रामसेवक तावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:22 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मंगळवारी अचानक धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. अनेक ग्रामसेवक गैरहजर असल्याचे आढळून आले. संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देविकास कामांची पाहणी : कटेझरीवासीयांसोबत संवाद

ऑनलाईन लोकमतधानोरा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मंगळवारी अचानक धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. अनेक ग्रामसेवक गैरहजर असल्याचे आढळून आले. संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुरूमगाव, बेलगाव, खेडेगाव, देवसूर, कटेझरी या गावाांना भेटी दिल्या. तेथील सिंचन विहीर, शौचालय बांधकाम, शेततळे आदींची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता दमाय, शाखा अभियंता खोब्रागडे, पं.स. चे विस्तार अधिकारी सावसाकडे, जुआरे आदी उपस्थित होते. कटेझरी ग्रामपंचायतीला सकाळी १०.३० वाजता भेट दिली असता, ग्रामसेवक इंगळे गैरहजर होते. मागील पाच वर्षांपासून नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींची दखल घेऊन गावाला भेट का दिली नाही, असा संतप्त सवाल गावकºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांसमोर उपस्थित केला. ग्रामसेवक इंगळे हे दोन महिन्यांपूर्वी रूजू झाले. पदभार स्वीकारल्यानंतर ते आलेच नाही. यापूर्वीचे ग्रामसेवक राऊत हे सुद्धा नियमितपणे येत नव्हते, असा आरोप कटेझरी येथील ग्रामसभा पदाधिकाºयांनी केला.