लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना दिलासाही देण्याचा प्रयत्न या पथकाने केला. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, यात खचून न जाता धीर धरा. झालेल्या नुकसानासाठी निकषाप्रमाणे मदत मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार दहाट आणि देसाईगंजमधील अधिकाºयांसह संबंधित विभागाचे सर्व विभाग प्रमुख, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यावेळी उपस्थित होते.शेतकºयांनी आपल्या शेतामध्ये उभे राहून नुकसानाबाबतची माहिती सांगितली. केंद्रीय पथकात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव तथा पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल व कार्यकारी अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता.दौºयाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरणाद्वारे या पथकाला नुकसानाची माहिती देण्यात आली.या पथकाने कनेरी, पारडी, गोगाव, देऊळगाव, ठाणेगाव, देसाईगंजमधील हनुमान वार्ड व सावंगी या ठिकाणी भेट दिली. यादरम्यान पथकाने स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधताना घरांचे, जनावरांचे तसेच शेतीमधील पिकांचा, झालेल्या इतर नुकसानाचा मोबदला मिळेल. त्याकरीताच आम्ही येथे आलो असल्याचे सांगितले. नुकसानाची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, तलाठी तसेच शासनस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांना पंचनामा करताना द्यावी, असे त्यांनी सांगितले. देसाईगंज येथील बायपास रस्त्याचे झालेले नुकसान, तसेच सावंगी गावातील घरांची झालेली पडझड, महावितरणचे वीज पुरवठ्याबाबत झालेले नुकसान, शेतीविषयक नुकसान याबाबत त्यांनी सविस्तर पाहणी केली.स्थानिक लोकप्रतिनीधींचा ेपथकातील सदस्यांशी संवादआरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, स्थानिक सभापती, सरपंच यांनी यावेळी गावस्तरावर उपस्थित राहून पथकातील सदस्यांशी संवाद साधला. जिल्हयातील पूरिस्थतीबाबत पथकाला निवेदनातून माहिती सादर केली. जिल्हयातील नागरिकांनी असा विनापावसाचा पूर कधीही पाहिला नाही. गेल्या २५ वर्षापूर्वीच्या पूरापेक्षा हा पूर जास्त मोठा असून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी त्यांनी पथकाकडे केली.
केंद्रीय पथक पूरग्रस्त भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन ...
केंद्रीय पथक पूरग्रस्त भागात
ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद । शेतावर जाऊन जाणून घेतली पीकांची दुरवस्था, गावांमध्येही पाहणी