शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:37 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस : पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाई वाढविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शनिवारी विश्वासघात दिवस पाळून स्थानिक इंदिरा गांधी चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ याप्रसंगी दुचाकीला हार टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखविली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते देऊन सत्तेवर काबीज केले. सत्तेवर आल्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा जनतेसमोर मांडू, असेही जिल्हा काँग्रेसने म्हटले आहे.परदेशातून १०० दिवसांत काळा पैसा आणू व सर्वांच्या खात्यात १५ लाख देऊ, असे आश्वासन निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आज ४८ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु काळा पैसा आला नाही. उलट निरव मोदी यांच्यासारख्या लोकांनी देशातील सफेद पैसा घेऊन परदेशात पळ काढला. हा विश्वासघात नाही तर काय, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवून २५ टक्के वॅटच्या माध्यमातून १७ लाख कोटी रूपये जनतेच्या खिशातून काढून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसा नाही. उलट १२ उद्योगपतींचे २ लाख ४१ हजार कोटी रूपये माफ करण्यात आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने कृषी क्षेत्रात कर लावला आहे. हा विश्वासघात नाही तर काय असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.केंद्र शासनाचा निषेध करताना जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, समशेर खॉ पठाण, प्रभाकर वासेकर, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, डी.डी. सोनटक्के, पी.टी.मसराम, हरबाजी मोरे, अधिर इंगोले, एजाज शेख, प्रभाकर बारापात्रे, तुकाराम पुरनवार, विवेक ब्राह्मणवाडे, नेताजी गावतुरे, महादेव भोयर, बाबुराव बावणे, सोनाली पुण्यपवार, नीलिमा राऊत, लता ढोक, पूजा अहिरे, तुळशिदास भोयर, कमलेश खोब्रागडे, मिलींद बागेसर, प्रतीक बारसिंगे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, प्रकाश मोहुर्ले, वैभव कळस्कर, कल्पक मुपिडवार व काँग्रेस, राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस