रमजान ईदनिमित्त गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, भामरागड, चामोर्शी, सिरोंचा या प्रमुख शहरांमध्ये सामूहिक नमाज पढण्यात आला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिरखुर्मा खाण्यासाठी निमंत्रित करून रमजान ईदचा आनंद द्विगुणित करण्यात आला. रमजान ईदनिमित्त जिल्ह्यात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील इदगाह येथे सामूहिक नमाज पढााना मुस्लिम बांधव.
जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
By admin | Updated: July 19, 2015 01:46 IST