कोरची : येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वजाचे रोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. देवराव गजभिये होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलवाल, मनोज अग्रवाल, बँक आॅफ इंडिया शाखेचे प्रबंधक मंजूर हुसैन, नंदू वैरागडे, शंकर शेंडे, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, हिराजी राऊत, मेघश्याम जमकात, ज्योती नैताम, हेमीनबाई केवास, जसवंती सोनार, निराशा गावतुरे, दामू येवले उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक गावतुरे, प्रास्ताविक जि. प. सदस्य पद्माकर मानकर तर आभार सुरेश सोरते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
कोरचीत शिवजयंती उत्साहात साजरी
By admin | Updated: March 27, 2016 01:39 IST