शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेºयातून आता प्रवाशांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:29 IST

येथील बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यादृष्टीने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगडचिरोली बसस्थानक : नऊ कॅमेरे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यादृष्टीने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.बसस्थानक परिसरात प्रवाशी, एसटी कर्मचाºयांची दिवसभर गर्दी राहते. त्यामुळे चोरीसह इतर अनुचित घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत होती. एसटी महामंडळाने राज्यातील जिल्हा स्थळावर असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकावरही नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कॅमेरे लावण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीच्या कर्मचाºयांनी दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी केली. एसटीच्या स्थानिक अधिकाºयांसोबत चर्चा करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित केली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये कॅमेरे लावले जाणार आहेत. कॅमेराची रेंज ८० मीटर आहे. आठ कॅमेरे फिक्स आहेत. तर एक कॅमेरा फिरणारा राहणार आहे. या संपूर्ण कॅमेराचे चित्रीकरण बसस्थानक प्रमुखांच्या कक्षात दिसणार आहे. प्रत्येक कॅमेराला १८० दिवसांचा बॅकअप देण्यात आला आहे. १८० दिवसांनंतर संबंधित कॅमेरातील डेटा दुसºया सीडीमध्ये अपलोड केल्यानंतर डिलिट केला जाणारा आहे. या कॅमेरांमुळे सहा महिन्यांपूर्वीचा डेटा सहज बघता येणार आहे.नक्षल घटनांवर नियंत्रणगडचिरोली जिल्हा नक्षल बाबत अतिशय संवेदनशील मानला जातो. नक्षलग्रस्त भागातूनही बसेस धावतात. बसस्थानकावर रात्रंदिवस गर्दी राहत असल्याने या गर्दीचा गैरफायदा नक्षल्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापूर्वीच गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी निर्माण करण्यात आली. या चौकीमध्ये चार वर्षांपूर्वी काही दिवस पोलिसांची नेमणूक केली जात होती. त्यानंतर पोलिसांची नेमणूक करणे बंद केले असले तरी अजुनही पोलीस चौकी कायम आहे. बसस्थानक परिसरात लागलेल्या कॅमेरांमुळे नक्षल घटनांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. दोन कॅमेरे बाहेर व आत जाणाºया प्रवेशद्वारावर ठेवले जाणार असल्याने बसस्थानकातून बाहेर निघणाºया बसेसवरही नियंत्रण राहणार आहे.इतरही बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचेप्रत्येक जिल्हास्थळावरील बसस्थानकावर कॅमेरे लावण्याचा निर्णय एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकावर कॅमेरे लागणार आहेत. मात्र इतरही बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी राहत असल्याने या ठिकाणच्या अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, आरमोरी, सिरोंचा, अहेरी व धानोरा या ठिकाणी बसस्थानक आहेत. या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.