शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

काेविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

गडचिराेली : काेराेना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे अनेकांचे उद्याेगधंदे बंद झाले. काही खासगी कंपन्यांतल्या नाेकऱ्या संपल्या. मात्र, बेराेजगार युवक, युवतींना ...

गडचिराेली : काेराेना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे अनेकांचे उद्याेगधंदे बंद झाले. काही खासगी कंपन्यांतल्या नाेकऱ्या संपल्या. मात्र, बेराेजगार युवक, युवतींना राेजगार मिळण्याची संधी काेराेनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली. गडचिराेली जिल्ह्यात ३०० वर कंत्राटी कर्मचारी काेविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असून, जिवाची जाेखीम पत्करून ते ड्युटी करीत आहेत. असे असले तरी शासनाकडून या कर्मचाऱ्यांना कुठलेही विमा संरक्षण नाही.

गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी चार काेविड रुग्णालये आहेत. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावर व उपजिल्हा रुग्णालयातही काेविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयात एकूण ९८७ कर्मचारी आहेत. यामध्ये नियमित व कंत्राटी कर्मचारी व डाॅक्टरांचा समावेश आहे. कंत्राटी कर्मचारी व डाॅक्टरांची संख्या ५७८ च्या आसपास आहे. जिल्हा परिषद, आराेग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाअंतर्गत बाह्यस्रोताद्वारे काेविडसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाॅक्स...

एकूण कर्मचारी - ९८७

कंत्राटी कर्मचारी - ५७८

जिल्ह्यातील काेविड केअर सेंटर - ११

बाॅक्स....

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे इन्शुरन्सच नाही - ९२ टक्के

बाॅक्स...

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

काेविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार १२ ते २० हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जात आहे. या वेतनाशिवाय कुठलेही विमा संरक्षण नाही. पीएफची सुविधा नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

बाॅक्स...

पुण्याच्या संस्थेला कंत्राट

काेराेना महामारीची पहिली लाट आल्यावर ही लाट व संसर्ग थांबविण्यासाठी आराेग्य यंत्रणा बळकट करण्यात आली. दरम्यान, काेराेनाबाधितांवर वेळेवर याेग्य औषधाेपचार व्हावा, यासाठी काेविड रुग्णालय स्थापन करण्यात आले. या काेविड रुग्णालयामध्ये बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारचे मनुष्यबळ पुरविणाऱ्या पुण्याच्या एका संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. या संस्थेकडून गडचिराेली जिल्ह्याच्या काेविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाॅक्स....

आतापर्यंत २२ जण पाॅझिटिव्ह

काेविड केअर सेंटरमध्ये काेराेनाबाधित रुग्णांना सेवा देण्याचे काम कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाेबतच वाॅर्डबाय, परिचारिका, सफाई कामगार, सल्लागार, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, आदींचा समावेश आहे. रुग्णालयात सेवा देताना कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही काेराेनाचा संसर्ग झाला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे.

बाॅक्स...

शासकीय सेवेत सामावून घ्या

काेविड रुग्णालयात सेवा देणे म्हणजे प्रचंड जाेखीम आहे. रुग्ण असलेल्या वाॅर्डात ऑक्सिजन सिलिंडर पाेहाेचवून देणे, मृतदेह पॅक करणे, नातेवाइकांकडील रुग्णांची वस्तू रुग्णांपर्यंत पाेहाेचवून देणे, पाण्याचे कॅन वाॅर्डात आणून ठेवणे, वाॅर्डात भाेजन व नाश्ता आणून ठेवणे, आदी कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. संसर्गाची भीती असल्याने विमा संरक्षण देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

काेट....

काेराेनाच्या पहिल्या लाटेपासून ते अजूनही आपण काेविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत आहे. आठ तासांची ड्युटी बजावून रुग्णाला सेवा देत आहे. मात्र, विमा संरक्षण नसल्याने अन्याय हाेत आहे.

- महेश किरंगे, कर्मचारी

काेट....

गडचिराेली जिल्ह्याच्या सर्वच रुग्णालयांत नियमित कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. काेराेना रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या आम्हा कर्मचाऱ्यांना रिक्त असलेल्या जागेवर रुग्णालयात नियमित कर्मचारी म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी आहे.

- प्रफुल बारसागडे, कर्मचारी