शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस एटीएमने ग्राहकांची पंचाईत; व्यवहार कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:30 IST

भगवान महावीर जयंती निमित्त बुधवारी बँकांना शासकीय सुट्टी होती. गुरुवारी गुडफ्रायडेची सुट्टी आल्याने सलग दोन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प होते.

ठळक मुद्देमार्च अखेरची लगबग : अर्धेअधिक एटीएम कुलूपबंद

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : भगवान महावीर जयंती निमित्त बुधवारी बँकांना शासकीय सुट्टी होती. गुरुवारी गुडफ्रायडेची सुट्टी आल्याने सलग दोन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प होते. दरम्यान गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागातील बहुतांश एटीएमची रोकड गुरुवारीच संपल्याने ग्राहकांची पंचाईत झाली.शुक्रवारी गडचिरोली शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, महाराष्टÑ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासह सर्वच शासकीय व खासगी बँकांच्या एटीएमची सेवा कोलमडली होती. अनेक एटीएमसमोर कॅशलेसचे फलक शुक्रवारी झळकत होते. चामोर्शी व चंद्रपूर मार्गावरील बहुतांश एटीएम रोकडअभावी बंद होते. याच कालावधीत बँकांना सुट्या असल्याने नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला.गडचिरोली शहरासारखीच आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी, एटापल्ली, धानोरा आदी ठिकाणीही एटीएमची अशीच व्यवस्था कोलमडली होती. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक रोकड काढण्यासाठी गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी देसाईगंज शहरात दाखल झाले. मात्र एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. मार्च एन्डींगमुळे नागरिकांचे बँक व्यवहार ठप्प झाले आहे. एकूणच गेल्या तीन दिवसांपासून बँकिंग व एटीएमची सेवा कोलमडली आहे.

 

 

टॅग्स :atmएटीएम