शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पैसे बुडविणारे तेंदूपत्ता कंत्राटदार पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:25 IST

२०१७ च्या तेंदूपत्ता हंगामातील मजुरी व रॉयल्टीचे पैसे बुडविणाऱ्या कंत्राटदारांनी कंपन्यांची नावे बदलवून पुन्हा यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामातील लिलावात सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे. अधिक भावाच्या लालसेपोटी याच कंत्राटदारांना यावर्षीचाही तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट मिळाल्यास ग्रामसभांची याही वर्षी फसवणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देयावर्षीही फसवणुकीची शक्यता : २०१७ मधील मजुरी दिलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७ च्या तेंदूपत्ता हंगामातील मजुरी व रॉयल्टीचे पैसे बुडविणाऱ्या कंत्राटदारांनी कंपन्यांची नावे बदलवून पुन्हा यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामातील लिलावात सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे. अधिक भावाच्या लालसेपोटी याच कंत्राटदारांना यावर्षीचाही तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट मिळाल्यास ग्रामसभांची याही वर्षी फसवणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.२०१७ च्या तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारांनी चढ्या दराने बोली लावून तेंदूपत्ता खरेदी केला होता. काही गावांच्या तेंदूपत्त्याचा दर सुमारे १८ हजार रुपये प्रती स्टॅन्डर्ड बॅग पर्यंत पोहोचला होता. बिडी निर्मिती कंपन्यांकडून दामदुप्पट भाव मिळेल, अशी अपेक्षा कंत्राटदारांना होती. मात्र काही दिवसातच तेंदूपत्त्याचे दर कोसळले. तेंदूपत्त्याच्या बाजारात प्रचंड मंदी निर्माण झाल्याने तेंदूपत्त्याची मागणीही घटली होती. कित्येक कंत्राटदारांचा तेंदूपत्ता वर्ष उलटूनही गोदामातच पडून होता. २०१७ च्या तेंदूपत्त्याच्या हंगामात कंत्राटदारांना मोठा तोटा सहन करावा लागला असला तरी करारनाम्याानुसार मजुरांची मजुरी व रॉयल्टीची रक्कम देणे हे कंत्राटदाराचे कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. मात्र काही कंत्राटदारांनी रॉयल्टी व मजुरीही दिली नाही. ग्रामसभांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले होते. मात्र कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली नाही. मागील वर्षीच्या कंपनीच्या नावाने कंत्राट मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन पैसे बुडविणाºया कंत्राटदारांनी नवीन कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या नावाने लिलावात सहभाग घेतला जात आहे. सदर कंत्राटदार लिलावादरम्यान अधिक बोली बोलून तेंदूपत्त्याचे कंत्राट आपल्याकडेच राहिल, याची व्यवस्था करतात. नंतर मात्र पैसे दिले जात नाही. त्यामुळे पैसे बुडव्या या कंत्राटदारांकडून यावर्षीही मजूर व ग्रामसभांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसभांनी अशा कंत्राटदारांबाबत सावध राहण्याची गरज आहे.तालुके बदलवून लिलावात सहभागीगडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कमीजास्त प्रमाणात तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. २०१७ च्या हंगामात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या दक्षिण भागातील तालुक्यांमधील ग्रामसभांचे पैसे बुडविणारे कंत्राटदार यावर्षी उत्तरेकडे असलेल्या कुरखेडा, कोरची, देसाईगंज या तालुक्यांमधील लिलावात सहभागी होत आहेत. पैसे बुडविल्याची माहिती ग्रामसभांना होऊ नये, यासाठी ही चाल खेळली जात आहे. ग्रामसभांनी तेंदूपत्त्याच्या लिलावाचा करार करताना संबंधित कंत्राटदाराची पूर्वपार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा याही वर्षी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या कंत्राटदारांनी फसवणूक केली, अशा कंत्राटदारांची नावे प्रशासनाच्या वतीने जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्रामसभा संबंधित कंत्राटदाराबाबत सावध राहतील.

टॅग्स :forest departmentवनविभाग