आशीर्वादनगरातील घटना : अज्ञात चोरट्यांनी फोडले घरगडचिरोली : गेल्या आठ-दहा दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी गडचिरोली शहरात धुमाकूळ माजविला आहे. घरी कुणीच नसल्याचे संधी साधून मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आशीर्वाद नगर येथे प्राचार्य डी. के. मेश्राम यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख ४ हजार ५०० रूपये व दोन दुचाकी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.प्राचार्य मेश्राम यांची वऱ्हाड्यांत ठेवलेली एमएच ३३ पी १७२२ क्रमांकाची टीव्हीएस जुपीटर दुचाकी चोरट्यांनी पळविली. तसेच येथूनच भाड्याने राहत असलेले दीपक चौधरी यांची हिरो होंडा पॅशन प्रो एमएच ३३ एच ९०२५ क्रमांकाची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. या संदर्भात प्राचार्य मेश्राम यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)मोबाईल चोरांचा सुळसुळाट३ जुलै रोजी रविवारी गडचिरोली आठवडी बाजारातून जवळपास नऊ मोबाईल संच अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. मोबाईल चोरट्यांनीही धुमाकूळ माजविला आहे. कन्नमवार नगरात शिक्षक सावरबांधे यांच्या भाडेकरूंच्या खोलीत चोरांनी प्रवेश केला. मात्र येथे काहीही मिळाले नाही.
दोन दुचाकींसह रोकड लंपास
By admin | Updated: July 6, 2016 01:52 IST