शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

ट्रक जाळणाऱ्या इसमांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:04 IST

१६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाºया बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्देगुरूपल्ली अपघात प्रकरण : आरोपींना केव्हाही अटक होणार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : १६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाऱ्या बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघात प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी ३० ते ४० इसमांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.सदर अपघात सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाºया ट्रकमुळे हा अपघात घडला. त्यामुळे सुरजागड प्रकल्प व लोहखनिज वाहतुकीला विरोध करीत लोकांनी सुरजागड पहाडावरील तब्बल १५ ट्रक जाळले. तसेच सात ट्रकच्या काचा फोडल्या. एटापल्ली येथे दोन दिवस मोठे आंदोलन करण्यात आले. अपघातात ठार झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह आंदोलनस्थळी तब्बल ३० तास ठेवण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना लायड्स मेटल कंपनीकडून २५ लाख रूपयांची मदत मिळवून देऊन, कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपावर नोकरी देणार, सुरजागड पहाडीवरील लोहदगडाची वाहतूक बंद करू, एटापल्ली-आलापल्ली या नवीन रोडचे काम आठ दिवसात सुरू करू, असे नानाविध आश्वासने दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर ट्रक जाळपोळ प्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात ३० ते ४० अज्ञात इसमाविरोधात भादंविचे कलम ४३५, ४२७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची ओळख पटविणे सुरू असून आरोपींना केव्हाही अटक होऊ शकते. सदर प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाचा तपास एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व ठाणेदार सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संजय राठोड करीत आहेत.

टॅग्स :fireआग