लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवशीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कारवाफा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर गडचिरोली येथील इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचा संघ उपविजेता ठरला.सदर क्रीडा स्पर्धा २९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही व गडचिरोली येथील इंग्रजी माध्यम आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेन्सीयल पब्लिक स्कूल या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित आश्रमशाळेच्या ७०० खेळाडूंनी भाग घेतला. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हॅन्डबॉल या सांघिक खेळासह वैयक्तिक खेळाचे आयोजन केले होते. सहभागी ९ शाळांमधून कारवाफा आश्रमशाळेने सर्वाधिक १५६ गुण मिळवित विजेतेपद प्राप्त केले तर उपविजेता गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला १३६ गुण मिळाले.क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.वाय. भिवगडे, कारवाफा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डब्ल्यू.के. भोयर, क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, क्रीडाप्रमुख व्ही.जी. चाचरकर, प्रसिद्धीप्रमुख माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, आर.जी. तुमराम, एच. के. कामडी, एम.एच. वनझारा, पी.आर. लोहकरे, पी.एस. रिघनाथे, जी.एस. सानप, डब्ल्यू.एम. घोडाम, वाय.एस. हर्षे, एन.डी. हेडो, व्ही.एम. बनगिनवार, के.एम. नेहरकर, यू.जी. बुरले, एन.एस. पानगंटीवार, ए.एम. किन्नाके, एस.के. कुनघाडकर, ए.ए. मेश्राम, ए.वाय. कुनघाडकर, तसेच कारवाफा बिट अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पंच, क्रीडा शिक्षक, कर्मचारी व खेळाडूंनी सहकार्य केले.कबड्डी, व्हॉलिबॉल व हॅन्डबॉलमधील विजेतेकारवाफा संघाने मुलांच्या १९ वर्षाखालील कबड्डी, व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम तर हॅन्डबॉलमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. १७ वर्षाखालील व्हॉलिबॉल व हॅन्डबॉल स्पर्धेत प्रथम तर १४ वर्षाखालील हॅन्डबॉलमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या १९ वर्षाखालील गटात व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम तर हॅन्डबॉलमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. १७ वर्षाखालील वयोगटात हॅन्डबॉलमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १४ वर्षाखालील व्हॉलिबॉलमध्ये प्रथम तर हॅन्डबॉलमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.उपविजेता ठरलेला गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा संघाने मुलांच्या १९ वर्षाखालील हॅन्डबॉलमध्ये प्रथम, १७ वर्षाखालील कबड्डीमध्ये प्रथम, खो-खो व हॅन्डबॉलमध्ये द्वितीय तर १४ वर्षाखालील खो-खोमध्ये प्रथम, व्हॉलिबॉल व हॅन्डबॉलमध्ये द्वितीय तसेच मुलींच्या १९ वर्षाखालील हॅन्डबॉलमध्ये प्रथम, १७ वर्षाखालील व्हॉलिबॉल, हॅन्डबॉलमध्ये प्रथम तर १४ वर्षाखालील हॅन्डबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
कारवाफा संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:52 IST
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवशीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली.
कारवाफा संघाला विजेतेपद
ठळक मुद्देबिटस्तरीय क्रीडा स्पर्धा : गडचिरोलीचा संघ उपविजेता