महिला व बाल रुग्णालय गडचिराेली शहराच्या मध्यभागी आहे, त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठीही हे साेयीचे हाेणार आहे. साेमवारपासून या ठिकाणी लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी नाेंदणी करण्याचीही सुविधा ठेवण्यात आली आहे. महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दीपचंद साेयाम यांच्या मार्गदर्शनात हे लसीकरण केंद्र चालविले जाणार आहे.
दर मंगळवारी लसीकरण बंद
दर मंगळवारी रुग्णालयात गराेदर माता व बालकांचे लसीकरण केले जाते. त्यामुळे दर मंगळवारी काेराेना लसीकरण केंद्र बंद राहणार आहे, तसेच दर रविवारी व शासकीय सुटीच्या दिवशी हे केंद्र बंद राहणार आहे. लसीकरण केंद्र बाह्यरुग्ण विभागात सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सकाळी १२ वाजेपर्यंत ओपीडी राहणार आहे. त्यामुळे लसीकरण दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंतच राहणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दीपचंद साेयाम यांनी दिली.