शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

भरधाव कारच्या धडकेत वनरक्षक ठार

By admin | Updated: December 21, 2014 22:58 IST

नागपूरवरून आरमोरीमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या भरधाव कारने गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना

आरमोरी : नागपूरवरून आरमोरीमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या भरधाव कारने गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना किटाळी-देऊळगाव दरम्यान रविवारला ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्या वनरक्षकाचे नाव अभय देवाजी डोंगरवार (३४) रा. पारडी असे आहे. तर योगेश पांडुरंग भोयर (१९) हा गंभीर जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार वनरक्षक अभय डोंगरवार व त्यांचा साळा योगेश भोयर हे दोघेही जण नव्या दुचाकीने सिलींडर घेऊन गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात होते. दरम्यान आरमोरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४९-१३४० या कारने किटाळीनजीक समोरून जबर धडक दिली. यात डोंगरवार व भोयर हे दोघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना कारमालक बबीता प्रदीप बोरीकर रा. नागपूर यांनी स्वत:च्या वाहनाने आरमोरीच्या ग्रामीण रूग्णालयात हलविले. दरम्यान प्रकृती अधिक गंभीर झाल्याने उपचारादरम्यान वनरक्षक अभय डोंगरवार यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला योगेश भोयर याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच कारचालक अमोल जयंत बोरकर (२४) रा. गिट्टीखदान नागपूर हा कार घटनास्थळी ठेवून पसार झाला. या अपघातात कार व दुचाकी प्रचंड क्षतिग्रस्त झाले. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार ताब्यात घेतली. कारचालक अमोल बोरकर याच्याविरूध्दात भादंविचे कलम २८९, ३३८, ३०४ अ व मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बच्चलवार करीत आहेत. गडचिरोली-आरमोरी मार्गावर अनेक वळण असल्याने सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)