शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कार व काळी पिवळी वाहनात भीषण टक्कर, सात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 12:20 IST

कार आणि काळी-पिवळी वाहनांत झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जिमलगट्टा (गडचिरोली)- कार आणि काळी-पिवळी वाहनांत झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास जिमलगट्टापासून 5 किलोमीटरवर असलेल्या गोविंदगावच्या बस थांब्याजवळ झाला.मृतांमध्ये कमल मारोती मित्तलवार (35), मारोती केशवराव मित्तलवार (60), लता मारोती मित्तलवार (55), श्रीनीता कमल मित्तलवार (5 महिने), सरस संदीप मित्तलवार (दीड वर्ष) तसेच गडचिरोलीजवळील मुरखेडाचे रहिवासी असलेले काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले (28) आणि चालक संदीप आनंदराव गडप (40) यांचा समावेश आहे. याशिवाय सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले हे जखमी आहेत. त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरच्या मित्तलवार कुटुंबातील लोक आपल्या सुझुकी बोलेनो कारने तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होते. याच वेळी सिरोंचावरुन मोहुर्ले कुटुंबीय घरचे सामान घेऊन मुरखेडाकडे येत होते. सिरोंचा पंचायत समितीमधून देवराव मोहुर्ले यांची बदली झाल्याने ते आपले सामान गावाकडे आणत होते. मात्र गोविंदगाव येथे दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली आणि सात लोकांना जीव गमवावा लागला.