लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरूमपल्ली ग्राम पंचायतीची २० वर्षांपासून निवडणूक झाली नव्हती. निवडणूक कार्यक्रम वेळोवेळी जाहीर करूनही नागरिकांच्या प्रतिसादाअभावी कोरमपूर्ती होत नव्हती. यंदाच्या मे महिन्यात पोट निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली.२० वर्षांपूर्वी कुरूमपल्ली ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी जोगी तलांडी आरूढ होते. त्यानंतर कुरूमपल्ली येथे ग्राम पंचायतीची निवडणूक झाली नाही. निवडणूक विभागाच्या आवाहनाला स्थानिकांचाही प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु यंदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आविसंचे विदर्भ नेते माजी आ. दीपक आत्राम व जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेतल्याने आविसंकडून स्थानिक उमेदवारांनी नामांकन दाखल केले. या निवडणुकीत आविसंचे पाच उमेदवार निवडून आले. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी मैनू जोगी तलांडी तर उपसरपंचपदी मासा येरा मडावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच ग्रा. पं. सदस्यपदी अमृता झाडे, गिला पोरिय गावडे, पोचा दसा कुळमेथे यांचीही बिनविरोध निवड झाली.निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार एन. एल. गुरनुले, तलाठी व्ही. एस.खवटी, ग्रामसेवक एच. डी. पुराम यांनी काम पाहिले. याप्रसंगी जि. प. सदस्य अजय नैताम, पं. स. सभापती सुरेखा आलाम, पं. स. सदस्य भास्कर तलांडे, कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी, वट्राचे सरपंच रवी आत्राम, अविसं कार्यकर्ते दिवाकर आलाम, संतोष ताटिकोंडावार, अशोक झाडे, शैलेश कोंडागुर्ले, राजू आत्राम, इरापा तलांडी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कुरूमपल्ली ग्रा.पं.वर आविसंचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:42 IST
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरूमपल्ली ग्राम पंचायतीची २० वर्षांपासून निवडणूक झाली नव्हती. निवडणूक कार्यक्रम वेळोवेळी जाहीर करूनही नागरिकांच्या प्रतिसादाअभावी कोरमपूर्ती होत नव्हती. यंदाच्या मे महिन्यात पोट निवडणूक घेण्यात आली.
कुरूमपल्ली ग्रा.पं.वर आविसंचा कब्जा
ठळक मुद्दे२० वर्षानंतर निवडणूक : सरपंच व उपसरपंचांसह तीन सदस्य बिनविरोध