शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता १०० ची, भरती २५० वर बालके व माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

भरती झालेल्या महिला व बालकांनी फुल्ल राहत असलेल्या महिला व बाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता आहे. या रुग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत वर्ग-४ ची २४ व वर्ग-३ ची ५ पदे भरायची होती. मात्र यापैकी एकही पद भरण्यात आले नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारभार चालविला जात आहे. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना संबंधित कामाचे कौशल्य राहत नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । वर्षभर राहते गर्दी : चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगडमधील रुग्णांमुळे ताण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १०० खाटांची क्षमता असलेल्या महिला व बाल रुग्णालयात वर्षभर २५० पेक्षा गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके भरती राहतात. क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असल्याने इतर कामांसाठी बांधण्यात आलेले इमारतीचे हॉल वॉर्ड म्हणून उपयोगात आणले जात आहेत. विशेष म्हणजे ही गर्दी वर्षभर कायम राहते.गुंतागुंतीची प्रसूती, रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून जिल्हास्तरावरील महिला व बाल रुग्णालयात रेफर केले जाते. जिल्ह्याबरोबच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यांसह छत्तीसगड राज्यातीलही काही महिला प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात भरती होतात. त्यामुळे सदर रुग्णालय नेहमीच फुल्ल राहते. महिला व बाल रुग्णांसाठी १०० खाटांची क्षमता असलेले स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र हे रुग्णालय सुद्धा आता अपुरे ठरत आहे. दर दिवशी जिल्हाभरातून ६० ते ७० महिला प्रसूतीसाठी व १० ते २० बालके उपचारासाठी भरती होतात. प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या प्रकृतीप्रमाणे काही दिवस भरती ठेवावे लागते.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढलाभरती झालेल्या महिला व बालकांनी फुल्ल राहत असलेल्या महिला व बाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता आहे. या रुग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत वर्ग-४ ची २४ व वर्ग-३ ची ५ पदे भरायची होती. मात्र यापैकी एकही पद भरण्यात आले नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारभार चालविला जात आहे. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना संबंधित कामाचे कौशल्य राहत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काम करवून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी परिचारिकांची २० पदे मंजूर आहेत. मात्र रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर एवढ्या परिचारिका एकाच शिफ्टसाठी आवश्यक आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे तर प्रशासकीय अधिकाऱ्याचेही एक पद रिक्त आहे. येथील अधीक्षकाला लिपिकासह सर्वच जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. अपुरा कर्मचारी वर्ग, त्यातच रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा अडीचपट अधिक आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.अपुºया कर्मचाºयांवर अधिक रुग्णांना सेवा देण्याची कसरत करावी लागत आहे. तरीही चांगली सेवा दिली जात आहे. शासनाने येथील रिक्तपदे भरावी, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. विशेष करून बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची वर्ग-४ ची पदे भरणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने वॉर्ड वाढविले जात आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने या वॉर्डांमध्ये कर्मचाºयांच्या नियुक्त्या करताना चांगलीच कसरत होत आहे.- डॉ.दीपचंद सोयाम, वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

टॅग्स :hospitalहॉस्पिटल