शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाच्या पदभरतीवर उमेदवारांचे आक्षेप; स्थगितीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 22:19 IST

जनसंपर्क अधिकारी पदासाठी नियमांना तिलांजली देण्यात आल्याची चर्चा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाकडून विविध पदांसाठी घेतली जात असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यातील जनसंपर्क अधिकारी या पदासाठीची मुलाखत प्रक्रिया नियमांना डावलून असल्याचा आरोप करत पदभरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी अनेक उमेदवारांनी केली आहे.कोणत्याही सरकारी पदभरतीत लेखी परीक्षेनंतर नमुना उत्तरपत्रिका आणि उमेदवारांना मिळालेले गुण जाहीर करणे आवश्यक असते. यासोबतच एका जागेसाठी किमान चार-पाच उमेदवारांना मुलाखतीला बोलविणे गरजेचे आहे. मात्र या दोन्ही बाबी गोंडवाना विद्यापीठाने टाळल्या. त्यामुळे यात घोळ झाल्याचा आरोप करून राज्यपाल, कुलगुरू यांच्याकडे दाद मागणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले. तेथूनही दखल न घेतल्यास न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा दिला आहे.गेल्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदभरतीची जाहीरात लागली. जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) या पदासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांनी अर्ज केले. २३ मार्च २०१८ ला अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. पण बरेच दिवस वाट पाहूनही ही प्रक्रि या पुढे सरकली नाही. त्यानंतर तब्बल सव्वा वर्षानंतर ४ जून २०१९ ला अर्ज छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली. यामध्ये ३७ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले, तर २४ उमेदवारांना विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आले. याच सुमारास या पदासाठी आवश्यक अभ्यासक्र म आणि नियमावलीही जाहीर करण्यात आली. नंतर १५ सप्टेंबरला लेखी परीक्षा असल्याचे पत्रक टाकण्यात आले. ही सर्व प्रक्रि या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जात होती. परीक्षेच्या ओळखपत्रासाठीही याच संकेतस्थळावर जावे लागले.  त्यानंतर लेखी परीक्षेच्या १० दिवसांत नमुना उत्तरपत्रिका याच संकेतस्थळावर झळकणे आवश्यक होते. पण उमेदवारांची निराशा झाली. एवढेच नाही तर उमेदवारांचे गुणही जाहीर करण्यात आले नाही. विद्यापीठाने थेट मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादीच जाहीर केली. त्यात केवळ दोन उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले.वास्तविक मुलाखतीसाठी एका जागेसाठी किमान चार-पाच उमेदवारांना बोलविणे अपेक्षित असते. सोबतच लेखी परीक्षेनंतर नमुना उत्तरपत्रिकाही जाहीर करावी लागते. पण हे सारे नियम गोंडवाना विद्यापीठाने पायदळी तुडविल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आहे.