शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:37 IST

आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची मागणी : वैरागड येथे स्थानिक प्रशासनाद्वारे दरवर्षी होते प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने बस थांब्यानंतर गांधी चौक, ग्रामपंचायत चौक, फुले चौक किंवा गावाअंतर्गत रस्त्यावर आल्यास त्यावर ग्रामपंचायत वाहतूक कर आकारते. त्यामुळे कोणतेही प्रवाशी वाहनधारक वाहतूक कराच्या भीतीपोटी गावात वाहन आणत नाही. एखादा व्यक्ती आजारी असल्यास किंवा वयोवृद्ध, दिव्यांग असल्यास त्याला बसथांब्यापासून घरापर्यंत पायपीट करून पोहोचावे लागते. एखाद्या चारचाकी वाहनचालकाला घरी पोहोचवून देण्याची विनंती केल्यास सदर वाहनधारक वाहतूक करावी संपूर्ण रक्कम वसूल केल्याशिवाय तो घरापर्यंत वाहनाद्वारे पोहोचवून देत नाही. या वाहतूक करामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय वैरागड येथे बहुसंख्य व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने अनेक दुकानदार विविध प्रकारचा माल दुकानात वाहनाद्वारे आणतात. अशावेळी त्यांनाही वाहतूक कराचा बोजा सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लागू केलेला वाहतूक कर गावातील सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांच्या मुळावर आला आहे. सदर कर रद्द करून केवळ मोठ्या वाहनांवर वाहतूक कर कायम ठेवावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांकडून होत आहे.स्थानिक प्रशासनाने गावात लागू केलेला वाहतूक कर ग्रामस्थांच्या मुळावर असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कराच्या नियमाचा फटका बसत आहे. तर व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. गावाअंतर्गत वाहतूक कर रद्द करावा, अशी मागणी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली. यासंदर्भात गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.ठराव पारित करण्याची प्रतीक्षाया वर्षात प्रवासी वाहन किंवा चारचाकी वाहनावरील वाहतूक करासंदर्भात लिलाव होणार नाही. परंतु चारचाकी वाहनापेक्षा मोठी वाहने गावात प्रवेश करतील. त्यांच्यावर वाहतूक कर आकारण्यात येणार आहे. धान डुलाई करणारी मोठी वाहने तसेच मोठी भारवाहक वाहने गावात रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. परिणामी रस्त्याने आवागमन करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो. तसेच मालाची चढउतार करण्यासाठी गावात मोठी वाहने येतात. अशा वाहनांवर कर आकारला जाणार आहे. यामध्ये कृषी व शासकीय वाहनांना सूट दिली जाईल. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने विचार सुद्धा केलेला आहे. परंतु अद्यापही रीतसर ठराव पारित करण्यात आला नाही.

टॅग्स :Taxकर