शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:35 IST

देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची मागणी : दोन वाहने असतानाही तिसरे खरेदी करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. शिवाय नगर पालिकेकडे आधीच दोन अग्निशामक असताना तिसऱ्या वाहनाची गरज काय, असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित करून अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.देसाईगंज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १४ नोव्हेंबर २०१७ ला घेण्यात आली. या सभेत विषय क्रमांक ६३/२ नुसार अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ठरावानुसार अग्निशामक यंत्र ज्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे, त्या कंपनीच्या वाहनाची खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक आहे. देसाईगंज शहरात अग्निशामक वाहन खरेदी करण्यापेक्षा पालिका क्षेत्रातील अनेक समस्या आहेत. तसेच आवश्यक सोयीसुविधाही अनेक वॉर्डांमध्ये नाही. वाहनावर खर्च होणारा निधी विकास कामांसाठी लावल्यास शहराचा विकास होण्यास मदत झाली असती, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. अतिआवश्यक सेवा सोडून अग्निशामक सुरक्षा वाहनाची गरज नसतानाही वाहन खरेदी करण्यात आले. तसेच ५९ लाख ८५ हजार रूपये वाहन खरेदीच्या रकमेत वस्तूंचे विवरणही देण्यात आले नाही. विशेष म्हणजे ४९ लाख ९० हजार रूपये किंमतीपासून अनेक कंपनींचे अग्निशामक वाहन बाजारात उपलब्ध आहेत.वाहन खरेदीत ९ ते १० लाख रूपयापर्यंतचा अधिक निधी खर्च केला जात असून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग पालिकेकडून केला जात आहे. यात नगर परिषदेलाही आर्थिक भूर्दंड पडणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आलेला अग्निशामक यंत्र खरेदी करण्याचा ठराव रद्द करावा, अशी मागणी गटनेता हाजी मो. आरिफ खानानी, नगरसेवक गणेश फाफट, नगरसेवक हरीश मोटवानी, नगरसेविका भाविका तलमले, उत्तरा तुमराम यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.शहरात स्वर्गरथ व रुग्णवाहिकेची आवश्यकतादेसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वैनगंगा नदीकाठावर न्यावे लागतात. मुख्यालयापासून सदर अंतर तीन किमीचे आहे. त्यामुळे पालिकेला स्वत:च्या मालकीचे एक स्वर्गरथ आवश्यक आहे. शिवाय नगरपालिकेत रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. पालिका क्षेत्रातील आजारी लोकांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे नगर पालिकेला रुग्णवाहिका व स्वर्गरथाची आवश्यकता आहे. अत्यंत निकडीच्या वस्तू खरेदी न करता पालिकेत उपलब्ध असलेल्या वस्तूंची खरेदी केली जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी प्रशासनावर केला आहे.