चामोर्शी - लालडोंगरी मार्गावर नहराचा मायनर आहे. त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावरून दररोज दुचाकी व अन्य वाहनांची वर्दळ असते. पूल सध्या जीर्णावस्थेत असून त्याला संरक्षण कठडे नाही. असे असतानाही नागरिक या पुलावरून ये-जा करीत असतात. अनेकदा या पुलावर किरकोळ अपघात सुद्धा झाले आहे. तरी पण शेतकरी, नागरिक, विद्यार्थी वाट काढीत ये-जा करतात. जीव धोक्यात घालून ये-जा करावे लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन या नहरावरील मायनरची उंची वाढवावी व रुंद पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी माजी सरपंच मालन बोदलवार, शेतकरी व लालडोंगरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
लालडोंगरी मार्गावरील नहराचा पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST