शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

हत्तीरोग दुरीकरण मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात सकाळी १० वाजता जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लाल फित कापून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वत: गोळ्या खाऊन या मोहिमेची सुरूवात केली. दरम्यान उपजिल्हा रूग्णालयातील अनेक रूग्णांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. अनंत जाधव, डॉ. विशाल येर्रावार, सुधाकर तिम्मा, शिवराम पुल्लुरी, प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक तसेच उपजिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

ठळक मुद्देठिकठिकाणी शुभारंभ : आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गोळ्यांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवारी जिल्ह्यात करण्यात आला. ठिकठिकाणी पाच वर्षावरील बालके व नागरिकांना गोळ्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्वांनी गोळ्या खाण्याचेही आवाहन याप्रसंगी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले.अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात सकाळी १० वाजता जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लाल फित कापून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वत: गोळ्या खाऊन या मोहिमेची सुरूवात केली. दरम्यान उपजिल्हा रूग्णालयातील अनेक रूग्णांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. अनंत जाधव, डॉ. विशाल येर्रावार, सुधाकर तिम्मा, शिवराम पुल्लुरी, प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक तसेच उपजिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.तुळशी : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी, अलबेंडाझॉल आयवरमेक्विन गोळ्या सेवनाची सामुदायिक औषध उपचार मोहीम राबविण्यास सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्यात आल्या. गोळ्या वाटप करताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उंचीचे मोजमाप करुन त्यानुसार ठरलेल्या प्रमाणात गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी तुळशी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रियंका नाकाडे, आरोग्य सेविका एस.एम.मेश्राम, व्ही.एस.भोयर, आरोग्यसेवक ललीत बडोले, मदतनीस विश्रांती लोणारे, आशावर्कर हिरकन्या रामटेके, शीला लोणारे व सचिन रामटेके उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक के.आर. गजापुरे, एन.जी. शेंडे, संदीप शेंडे यांनी सहकार्य केले. शाळेत मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर गावात आशावर्कर व आरोग्य कर्मचाºयांनी घरोघरी भेट देऊन गोळ्यांचे वितरण केले.ही आहेत हत्तीरोगाची लक्षणेमायक्रोफालेरिया संसर्गीत डासांमुळे हत्तीरोगाचे संक्रमण होते. सुरवातीच्या काळामध्ये अंगदुखी, ताप अशी साधारण लक्षणे दिसून येतात. तथापी कालांतराने लसिका वाहिन्या व ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण होऊन हत्तीरोग व अंडवृध्दी होते. हा एक दीर्घ मुदतीचा मानसिक व शारीरिक क्लेश देणारा आजार आहे. आजार पूर्णत: बरा होण्यासाठी दीर्घकाळ गोळ्यांचे सेवन करावे लागते. परंतु प्रतिबंधात्मक औषधी घेतल्याने हत्तीरोगास प्रतिबंध घालता येतो. वर्षातून एकदाच राबविल्या जाणाऱ्या हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वितरित केल्या जाणाºया गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.