शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात हिंमत! ९ महिन्यांची गरोदर महिला २३ कि.मी.चे अंतर चालून आली दवाखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:57 IST

जंगलातील अवघड वळणे, काटे कुटे आणि नदी नाले पार करणे हे सोपे नाही. शहरातील माणसांना तर अवघडच. मात्र असा तब्बल २३ कि.मी. चाअवघड प्रवास एका गरोदर महिलेने पूर्ण केला.

ठळक मुद्देतुर्रेमर्का गावातील महिलानाल्याच्या पाण्यातून वाट काढत आशा वर्करच्या मदतीने गाठले लाहेरीदुर्गम भागातील रस्त्यांअभावी समस्या

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बिनागुंडा परिसरात असलेल्या तुर्रेमर्का येथील रोशनी संतोष पोदाडी या २३ वर्षीय गरोदर मातेने तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंतचा चक्क २३ किमीचा प्रवास पायी पायी केला. त्यानंतर सदर महिलेला रूग्णवाहिकेने लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर महिलेने सुखरूपणे बालिकेला जन्म दिला, पण त्या महिलेची आपबिती ऐकूण डॉक्टरही अचंबित झाले.तुर्रेमर्का हे गाव बिनागुंडापासून ५ किमी तर भामरागडपासून ४० किमी अंतरावर आहे. त्या परिसरात लाहेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्रसुतीसाठी येथील महिलांना लाहेरी येथेच यावे लागते.लाहेरी ते तुर्रेमर्का दरम्यानचे अंतर २३ किमी आहे. डॉक्टरांनी लिहून दिल्यानुसार रोशनीच्या प्रसुतीची तारीख जवळ आली होती. त्यामुळे गावातील आशा वर्कर पार्वती उसेंडी हिने रोशनीला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती होण्याचा सल्ला दिला. लाहेरीपासून ६ किमी अंतरावरच गुंडेनूर नाला आहे. सदर नाला वाहण्यास सुरूवात होते. बिनागुंडा परिसरात एक पाऊस पडल्यानंतर वाहन जात नाही. त्यामुळे लाहेरीपर्यंतचे अंतर पायदळ गाठल्याशिवाय पर्याय नसतो.रोशनीने सुमारे २3 किमी अंतर पायदळ चालून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. गुंडेनूर नाला ओसंडून वाहत असतानाही त्यातून वाट काढावी लागली. शुक्रवारी सकाळी १० वाजता रोशनी, तिचा पती, मोठा मुलगा आणि आशा वर्कर हे चौघेजण तुर्रेमर्का येथून निघाले. दुपारी २ वाजता ते लाहेरी येथे पोहोचले. लाहेरी येथून रूग्णवाहिकेने रोशनीला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. काही वेळातच रोशनी प्रसुत होऊन तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.विशेष म्हणजे, २3 किमी अंतर चालल्यानंतरही रोशनीच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यावरून दुर्गम भागातील आदिवासी महिलांच्या सुदृढ स्वास्थ्याची दृढ निश्चयाची कल्पना येते.

टॅग्स :Healthआरोग्य