गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व धानोरा तालुक्यातील धानोरा या पंचायत समिती गणाच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळविले असून जेप्रा पं.स. गणातून काँग्रेसच्या अमिता शामकांत मडावी २८० मतांनी विजयी झाल्या आहे. तर धानोरा पं.स. गणातून काँग्रेसच्या ममिता अवसूजी किरंगे १२१ मतांनी विजयी झाल्या आहे. धानोराची जागा काँग्रेसने आपल्या कब्ज्यात राखण्यात यश मिळविले तर जेप्राची जागा मात्र त्यांनी अपक्षांकडून खेचून आणली आहे.गडचिरोली तालुक्यातील जेप्रा पंचायत समिती गणात काँग्रेसच्या अमिता शामकांत मडावी यांना १ हजार २५८, भाजपच्या नंदा दत्तात्रय सलामे यांना ९७८, शिवसेनेच्या पुस्तकला अरूण सिडाम यांना ५९३ मते मिळाली. तर ६७ मतदारांनी नोटाचा वापर केला. एकूण २ हजार ८९६ मते वैध ठरली. काँग्रेसच्या अमिता मडावी यांनी भाजपच्या सलामे यांचा २८० मतांनी पराभव करून ही जागा काँग्रेसच्या पदरात पाडली. धानोरा पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या ममिता अवसूजी किरंगे या १२१ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या सुशिला सुखदेव टेकाम यांचा पराभव केला. ममिता किरंगे यांना १ हजार ३८ तर सुशिला टेकाम यांना ९१७ तर शिवसेनेच्या कल्पना होळी यांना १८८ मते मिळाली. ८१ मतदारांनी नोटाचा वापर केला. या दोन्ही विजयानंतर काँग्रेसने मोठा जल्लोष साजरा केला. गडचिरोली येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दयाराम भोयर यांनी काम पाहिले. धानोरा येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी शशिकांत चन्नावार, नायब तहसीलदार सुधाकर मडावी यांनी काम पाहिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)जेप्रा पंचायत समिती गणमतदान केंद्रअमिता मडावीनंदा सलामेपुस्तकला सिडामनोटा जेप्रा१६४११९९२९राजगाटा माल१५२६२९१९खुर्सा३२६१७९४८११बामणी७६२३१६८११बामणी३७५३२७१सावरगाव१४८५२२३०११बोदली माल२१७१९९२७११बोदली तु.१३८८३१०४एकूण १,२५८९७८५९३६७धानोरा पंचायत समिती गणमतदान केंद्रममिता किरंगेसुशिला टेकामकल्पना होळीनोटा सोडे२९९१५११४हेटी२६२१२९२३१५सालेभट्टी२५७३४१७४३१सालेभट्टी४०६७२६७येरकड१८०३६५५४२४एकूण १,०३८९१७१८८८१
पं.स.च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी
By admin | Updated: April 19, 2016 05:32 IST