शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख क्विंटल धानाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:23 IST

जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

ठळक मुद्दे१५ कोटींचे चुकारे दिले : पुढील आठवड्यात सुरू होणार सर्व खरेदी केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील १९ खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत. ते पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत.खरीप हंगामातील धानाची कापणी होऊन बहुतांश भागात मळणीही आटोपत आली आहे. दक्षिण गडचिरोली भागातल्या सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील ३४ पैकी १९ खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे ४ खरेदी केंद्र सुरू व्हायचे आहेत. जिल्हाभरातील एकूण १०१ मंजूर खरेदी केंद्रांपैकी ७८ केंद्र सुरू झाले आहेत.आदिवासी विकास महामंडळाचे जिल्हाभरात सर्वाधिक ८६ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५२ केंद्र असून ते सर्वच केंद्र सुरू झाले आहेत. मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदीसाठी १५ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी ११ केंद्र सुरू असून चार केंद्र गोदाम उपलब्ध झाले नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मार्केटिंग फेडरेशन खरेदी केलेला सर्व धान गोदामातच ठेवते हे विशेष. गोदामाची व्यवस्था होईपर्यंत धानाची खरेदी सुरूच केली जात नाही.विशेष म्हणजे यावर्षी ‘ए’ ग्रेडचा धान अद्याप कोणत्याही केंद्रावर आलेला नाही. खरेदी केलेला संपूर्ण धान साधारण ग्रेडचा आहे. आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांना ९ कोटी ४४ लाख ४० हजार रुपयांचे चुकारे केले आहे तर मार्केटिंग फेडरेशनने ५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपयांचे चुकारे दिले आहेत.आठ केंद्रांवर आवकच नाहीअहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३४ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी १५ केंद्र सुरू झाले आहेत. मात्र ८ केंद्रांवर अद्याप शेतकºयांनी धानच आणलेला नाही. त्यात मुलचेरा तालुक्यातील इंदाराम, आलापल्ली व पेरमिली, मुलचेरा तालुक्यातील मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, भामरागड तालुक्यातील ताडगाव आणि कोठी तसेच एटापल्ली तालुक्यातील गेंदा व जाराबंडी या केंद्रांचा समावेश आहे. या भागात उशिरा धान निघत असल्यामुळे ही परिस्थिती असून पुढील आठवड्यात उर्वरित १९ केंद्र सुरू होतील, असे अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक मुलेवार यांनी सांगितले.यावर्षीही धान उघड्यावरआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान सध्या संस्था, ग्रामपंचायती, कृषी विभाग आणि शासकीय गोदामांमध्ये साठवून ठेवला आहे. या गोदामांत ८० ते ९० हजार क्विंटल धान आहे. मात्र उर्वरित जवळपास ५० हजार क्विंटल धान उघड्यावरच आहे. यापुढे खरेदी होणारा धानही उघड्यावरच राहणार आहे.भरडाईसाठी ४९ प्रस्तावांना मंजुरीधानाच्या भरडाईसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ४९ राईस मिलर्सचे प्रस्ताव आदिवासी विकास महामंडळाकडे आले आहेत. त्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून करारनामे होताच धानाच्या भरडाईला सुरूवात होणार आहे. महामंडळाकडे धान साठविण्यासाठी पुरेशा प्रमाणात गोदामे नसल्यामुळे उघड्यावरच धान ठेवावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरडाईला सुरूवात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.