शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

ग्रामपंचायतींतर्फे सरसकट साहित्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:16 IST

शासन निर्णयानुसार बांधकाम करायच्या साहित्याची किम्मत एक लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास सदर साहित्य ई-निविदा काढून खरेदी करणे आवश्यक होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : चौकशी समितीने ओढले ताशेरे, चौकशीदरम्यान अनेक अनियमितता आढळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासन निर्णयानुसार बांधकाम करायच्या साहित्याची किम्मत एक लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास सदर साहित्य ई-निविदा काढून खरेदी करणे आवश्यक होते. मात्र सरपंच व सचिव यांनी ई-निविदा न काढताच सरसकट खूल्या बाजारातून साहित्य खरेदी केली. पुरठादारांमध्ये स्पर्धा होऊन किमान दराला साहित्य खरेदी करता येईल यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन दर मागविले नाही. याची तपासणी अधिकाºयांनी केली नाही. त्यामुळे यात गैरव्यवहार झाले असल्याचे दिसून येत आहे. असे सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात केलेल्या समितीला आढळून आले आहे. याबाबत समितीने प्रचंड ताशेरे सुद्धा ओढले आहेत.अहवालात म्हटले आहे की, देसाईगंज तालुक्यातील कसारी व शिवराजपूर या दोन ग्रामपंचायती वगळता इतर ग्रामपंचायतींनी साहित्य खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. खुल्या निविदा पद्धतीने तीन निविदा/दरपत्रक मागवून साहित्य खरेदी करण्यात आल्याचे ग्रामसेवकांनी सांगीतले. तथापी बºयाच ग्राम पंचायतींमध्ये साहित्य खरेदीबाबतचे दरपत्रके/निविदा मागण्याबाबतचा ठराव/पत्र, प्राप्त झालेली निविदा/दरपत्रके यांचा तुलनात्मक तक्ता व पुरवठादारास दिलेले आदेश तसेच पुरवठादाराने दर मान्य केल्याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव या बाबी तपासणी दरम्यान आढळून आल्या नाहीत. याचा अर्थ ग्रामपंचायतींनी साहित्य खरेदीसाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. नियमांना डावलून पसंतीच्या पुरवठादाराकडून खूल्या बाजारातून सरसकट साहित्य खरेदी करण्यात आली असल्याचे स्पष्ट होत आहे, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.रोख पुस्तकांची तपासणी केली असता, मोजमाप पुस्तिकेत नोंदविलेल्या मोजमापांवर आधारित बांधकाम विभागाने केलेल्या चालु वा अंतिम देयकांच्या प्रदानाचे आधारावर साहित्य पुरवठादारास व मजुरांची मजुरी प्रदान केल्याचे दिसून आले. मात्र चालू व अंतिम देयकाप्रमाणे वेळोवेळी केलेल्या साहित्य खरेदीचा तपशील, झालेल्या कामांचे परिणाम किंवा इतर आनुषांगिक तांत्रिक बाबींनुसार अपेक्षित नोंदी रोख पुरस्तकात आढल्या नाहीत. रोखपुस्तकातील प्रदानाच्या नोंदी अत्यंत मोघम स्वरूपाच्या आहेत.काही ग्रामपंचायतींमध्ये साठा पंजी तपासणीसाठी उपलब्ध झाल्या नाहीत. प्राप्त झालेल्या नोंदी व्यवस्थीत जुळत नाही. पुरवठादाराला देयके प्रदान करताना दोन टक्के आयकर कपात केला नाही. कपात केलेली रक्कम चालनाद्वारे शासनाकडे जमा केली नाही. साहित्य व मजुरीवर खर्च नियमानुसार झालेला नाही. याची तपासणी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून झालेली नाही.निधीची बचत करणे हा मुख्य उद्देश ग्रामपंचायत स्तरावर कामे करण्यामागे असतो. मात्र निधीची बचत झाली नाही असे चौकशी अहवालात म्हटले आहे.काही ग्रामपंचायतींना एकापेक्षा अधिक कामे एकाच मुदतीत व एकाच तारखेस दिली आहेत. नियमानुसार जरी १५ लाख रूपयांच्या आतील कामे असले तरी एकाच मुदतीत व एकाच तारखेत दिलेली कामे १५ लाख रूपयांपेक्षा अधिक आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुरवठादार किंवा यंत्रणा निश्चित केलेली नाही. साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शक सूचना दिल्या नाहीत.सेल्फ चेकने मोठ्या रकमेची उचलबँक खातेपुस्तकाची पडताळणी केली असता रोखपुस्तकातील जमा बाजूच्या नोंदी बहुतांश जुळतात. मात्र पासबुकातून खर्ची पडलेल्या किंवा काढण्यात आलेल्या रकमा व रोखपुस्तकातील खर्चाचे बाजूस दाखविलेल्या नोंदीची पडताळणी करता येत नाही. पासबुकात क्रमनिहाय निधी वजा झालेला दिसून येत नाही. मात्र कामाच्या शेवटी १०० टक्के निधी खर्च झालेला दिसून येतो. बºयाच ठिकाणी सेल्फ चेकने मोठ्या रकमांची उचल झालेली आहे. एकाच नावाने बऱ्याचदा मोठ्या रकमा आहरित करण्यात आल्या आहेत. याबाबतच्या सविस्तर नोंदी रोखपुस्तकात नसल्याने पडताळणी करता येत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार नियमानुसार केला नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत