आॅनलाईन लोकमतगडचिरोली- मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूरकडून नागपूरकडे जाणारी बस बुधवारी सकाळी अरुंद रस्त्यावरून जाताना पावसामुळे रस्ता खचल्याने एका बाजूला कलंडली. या बसमध्ये त्यावेळी ६० ते ७० प्रवासी होते. त्यात ३० ते ३५ शाळकरी मुलेही होती. मात्र जवळपासच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरविले. वृत्त लिहिस्तोवर बसला बाहेर काढण्यासाठी कुमक आलेली नव्हती.
रस्ता खचून बस कलंडली
By admin | Updated: July 12, 2017 15:55 IST