लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुमारे तीन कोटी रूपये खर्चुन गडचिरोली येथील बसस्थानकाचे नूतनीकरण केले जाणार आहे. सदर काम वर्षभरापासून सुरू झाले आहे. मात्र या कामाची गती अतिशय संथ आहे.गडचिरोली येथील बसस्थानक जिल्हास्तरावरील असल्याने या बसस्थानकाचा व्याप मोठा आहे. याच बसस्थानकातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जातात. बसची संख्या, प्रवाशी, एसटी कर्मचारी वाढल्याने बसस्थानक लहान पडू लागले. फलाटांची संख्या वाढविणे आवश्यक होते. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने थोडेफार बांधकाम करणे आवश्यक झाले होते. त्यादृष्टीने एसटी महामंडळाने सुमारे तीन कोटी रूपये मंजूर केले. यातून बसस्थानकाचे नूतनीकरण व बाजूलाच नवीन इमारत बांधायची होती. मात्र काम अतिशय संथगतीने सुरू आहे. वर्षभराचा कालावधी उलटला तरी केवळ इमारतीचे खांब उभे झाले आहेत. बसस्थानकाचा अर्धा भाग कुलूपबंद करण्यात आला असल्याने प्रवाशी व नागरिकांना अडचण होत आहे.
बसस्थानकाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:30 IST
सुमारे तीन कोटी रूपये खर्चुन गडचिरोली येथील बसस्थानकाचे नूतनीकरण केले जाणार आहे. सदर काम वर्षभरापासून सुरू झाले आहे. मात्र या कामाची गती अतिशय संथ आहे.
बसस्थानकाचे काम संथगतीने
ठळक मुद्देवर्ष उलटले : १० टक्केही काम पूर्ण झाले नाही