शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेने बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:39 IST

तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देमन्नेराजाराम-भामनपल्ली मार्ग उखडला : खासगी वाहनातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद झाली आहे. परिणामी मन्नेराजाराम परिसरातील शेकडो नागरिकांना दररोज खासगी वाहनाद्वारे याच खडतर मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सद्य:स्थितीत मन्नेराजाराम-भामनपल्ली या डांबरी मार्गाची अवस्था खडीकरण मार्गासारखी झाली आहे. डांबरीकरण उखडल्यानंतर दुरूस्तीदरम्यान येथे डांबर टाकायला पाहिजे होते. मात्र मुरूम व गिट्टी तसेच मातीची मलमपट्टी करून कशीबशी या मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. गेल्या १० वर्षात सदर मार्गाची एकदाही पक्की दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे सदर मार्गावर खड्ड्यांची आरास निर्माण झाली आहे. परिसरातील २० गावातील नागरिक याच मार्गाने आवागमन करतात. भामरागड तालुका मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावरील ताडगावापासून २० किमी अंतर मन्नेराजाराम गावाचे आहे. जड वाहनांचे आवागमन नसताना सुध्दा मन्नेराजाराम मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्यानंतर मुरूम व गिट्टी टाकून गतवर्षी या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू झाली. त्यानंतर डांबरी पॅचेस टाकून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काम सुरू करण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी या कामाला विरोध करीत डांबराचे ड्रम जाळून टाकले. तेव्हापासून रस्ता दुरूस्तीच्या कामाकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.मन्नेराजाराम-भामनपल्ली मार्गावर बससेवा सुरू होती. २० नागरिकांचा या मार्गावरून प्रवास सुरू होता. परंतु १५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दुरवस्थेच्या कारणावरून महामंडळाची बसफेरी बंद झाली. सदर मार्गावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. रस्ता दुरूस्तीबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पारीत करण्यात आला आहे. सदर ठराव पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. सदर गंभीर समस्येकडे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी लक्ष घेऊन सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.- रंगय्या मडावी,सरपंच, मन्नेराजाराम, ता.भामरागड