शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात बससेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी) स्थापना दिनानिमित्त २ डिसेंबरपासून सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहापूर्वी नक्षलवाद्यांनी धानोरा, कोरची तालुक्यासह अहेरी उपविभागात ठिकठिकाणी पत्रके टाकून हा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. सदर सप्ताहाचा पहिल्या दिवशी शनिवारला एटापल्ली, कोरची तालुक्यात प्रभाव आढळून आला. दुसºया दिवशी ...

ठळक मुद्दे अनेक फेऱ्या रद्द : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी) स्थापना दिनानिमित्त २ डिसेंबरपासून सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहापूर्वी नक्षलवाद्यांनी धानोरा, कोरची तालुक्यासह अहेरी उपविभागात ठिकठिकाणी पत्रके टाकून हा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. सदर सप्ताहाचा पहिल्या दिवशी शनिवारला एटापल्ली, कोरची तालुक्यात प्रभाव आढळून आला. दुसºया दिवशी रविवारला संपूर्ण धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात तसेच अहेरी उपविभागाच्या दुर्गम गावांमध्ये नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा परिणाम काही अंशी दिसून आला. रविवारी धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक बसफेºया प्रभावित झाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.पीएलजीए सप्ताहादरम्यान गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागातील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा तसेच खासगी वाहतुकही बंद होती. महामंडळाची गडचिरोली-गोडलवाही ही बसफेरी धानोरापर्यंत पोहोचली. तसेच गडचिरोली-खांबाळा बसफेरी धानोरापर्यंत धावली. गडचिरोली-कोटगुल ही बसफेरी मुरूमगावपर्यंत तर गडचिरोली-मानपूर ही बस फक्त धानोरापर्यंत सुरू आहे. खांबाळा मार्गावर महामंडळाची बस व खासगी वाहतूक पूर्णत: बंद आहे. गडचिरोली आगारातून गडचिरोली-कारवाफा-पेंढरी ही बसफेरी सोडली जाते. मात्र नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान रविवारी ही बसफेरी गडचिरोली येथून कारवाफा-पेंढरीपर्यंत पोहोचली. मात्र ही बस पेंढरीच्या पुढे धावली नाही. घोटपर्यंत महामंडळाच्या बसफेºया सुरू असल्या तरी घोटपुढे जाणाºया ग्रामीण भागात महामंडळाची बस वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. सदर सप्ताहादरम्यान मात्र छत्तीसगड राज्यातून धानोरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स रविवारी वाहतुकीवर सुरू होत्या.अहेरी उपविभागासह कोरची, कुरखेडा तालुक्यात तसेच भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात पीएलजीए सप्ताहादरम्यान नक्षली दहशत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली शेतीतील कामे काही प्रमाणात थांबविली आहे.