कुरखेडा : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष उलटले तरी कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या चारभट्टी गावासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे गावातील नागरिकांना दळणवळणासाठी प्रचंड पायपीट करावी लागत होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे महामंडळाच्या गडचिरोली आगाराने रविवारपासून कुरखेडा-चारभट्टी बसफेरी सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकानंतर दुर्गम चारभट्टी गावाला महामंडळाची बस पोहोचली. रविवारी कुरखेडा येथे जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी प्रथमच सुरू झालेल्या कुरखेडा-चारभट्टी बसफेरीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्रभाकर तुलावी, बसस्थानक प्रमुख राठोड, नरेंद्र किरणकर, सरपंच संजय दर्रो, उपसरपंच पितांबर बह्याळ, ग्रा.पं. सदस्य तुलाराम हलामी, रंजना तिरगम, सुगंधा मडावी, शामराव गोटा, करगसू कवडो, सुरेश कवडो, यशवंत मांडवे, ऋषी हलामी, वासुदेव निंबेकर, रमेश सरदारे, संदीप तिरगम, गजानन नाट आदीसह प्रवाशी व नागरिक उपस्थित होते. चारभट्टी गावासाठी महामंडळाने बससेवा सुरू केल्यामुळे चारभट्टी गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांसह प्रवाशांची झाली सोय४चारभट्टी गावातील अनेक विद्यार्थी कुरखेडा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची ये-जा करण्यासाठी प्रचंड पायपीट होत होती. या समस्यची दखल घेऊन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व पं.स. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी बसफेरीसाठी आगाराकडे पाठपुरावा केला. त्यामुळे बसफेरी सुरू झाली.
साडेसहा दशकानंतर चारभट्टीत पोहोचली बस
By admin | Updated: December 7, 2015 05:33 IST