गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची जनभावना अधिक तीव्र करण्यासाठी जनमंच संघटनेच्यावतीने आज शनिवारी येथील बसस्थानकावर बस देखो आंदोलन करण्यात आले. जनमंच संघटनेचे पदाधिकारी प्रकाश इटनकर, अरूण पाटील मुनघाटे यांच्या नेतृत्वात या आंदोलनादरम्यान शेकडो प्रवाशांना विदर्भाचा धागा बांधण्यात आला. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे, स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याचा विकास नाही, अशी नारेबाजीही उपस्थित आंदोलनकर्ते व विद्यार्थ्यांनी केली. या आंदोलनात नामदेवराव गडपल्लीवार, रोहिदास राऊत, संतोष खोब्रागडे, समय्या पसूला, अमिता मडावी, रमेश भुरसे, सुधाकर चन्नावार, महादेव गेडाम, मुकूंदा उंदीरवाडे, श्रीहरी चौधरी, सुभाष धाईत, सुनील खोब्रागडे, सतीश विधाते, राकेश रत्नावार, रामन्ना बोंकुलवार, बाशीद शेख, दत्तात्रय बर्लावार, प्रभाकर बारापात्रे, देविदास बारसिंगे, रमेशअण्णा उप्पलवार, सुरेश भांडेकर, शंकरराव काळे, मुर्लीधर बद्दलवार, विनायक कुंदोजवार आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित जनमंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विदर्भ राज्याबाबत प्रखर भूमिका मांडली. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षात संयुक्त महाराष्ट्रात राहून मराठवाडा व पश्चिम विदर्भातील पुढाऱ्यांच्या भेदभाव प्रणालीमुळे विदर्भाच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. यामुळेच आदिवासी बहूल दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. (स्थानिक प्रतिनिधी)
विदर्भवाद्यांचे बस देखो आंदोलन
By admin | Updated: August 9, 2014 23:41 IST