शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरचीत घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:48 IST

येथील विश्वनाथ नागोजी मोहुर्ले यांच्या घराला बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले.

ठळक मुद्दे५० लाखांचे नुकसान : आठ पैकी सात खोल्यांमध्ये आग

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : येथील विश्वनाथ नागोजी मोहुर्ले यांच्या घराला बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले.आग लागलेले घर हे चाळीप्रमाणे असून या घरी चरणदास खोब्रागडे, अशोक करंजेवार, प्रदीप नंदेश्वर, राजू नेवारे, मोहन इरले आदी भाड्याने राहत होते. दिवाळी असल्याने सर्वच कुटुंब बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसल्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महेश जांभूळकर यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करीत होत्या. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. काही प्रमाणात साहित्यही बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे साहित्य बचावले. मात्र इतर भाडेकरूंचे साहित्य जळून खाक झाले. नेमके किती रूपयांचे नुकसान झाले आहे, याचा निश्चित आकडा सांगता येत नसला तरी या घरात जवळपास १० भाडेकरू राहत होते. सर्वच भाडेकरू शासकीय कर्मचारी असल्याने प्रत्येकाच्या घरी टीव्ही, फ्रिज, अलमारी, गॅस, दागदागिणे, कपडे व इतर साहित्य होते. हे सर्व साहित्य जळाल्याने जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.आग लागल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. आग लागल्याची माहिती कळताच पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफडे, नायब तहसीलदार ओके, माजी नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलाल, नंदकिशोर वैरागडे यांच्यासह गावातील नागरिक व वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.नागरिकांनी मागच्या खिडक्या तोडून स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तरीही आठपैकी सात कर्मचाऱ्यांच्या खोलीतील साहित्य जळून खाक झाले. केवळ एका कर्मचाºयाचे साहित्य वाचले.

टॅग्स :fireआग